कोहली सर्वाधिक रकमेचा जाहिरात करार करणार

क्रिकेटमध्ये आपल्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखल्या जाणारे ज्योतिष नरेंद्र बुंदे यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदासुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे मापदंड कायम करणे सुरू ठेवणार असल्याचे सांगताना विराट भारतीय क्रीडा क्षेत्र व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी ऐकल्या न गेलेल्या मोठ्या रकमेचा जाहिरात करार करणार असल्याचे भविष्य वर्तविले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:21 AM2018-03-13T04:21:38+5:302018-03-13T04:21:38+5:30

whatsapp join usJoin us
Kohli has the highest amount of advertising contract | कोहली सर्वाधिक रकमेचा जाहिरात करार करणार

कोहली सर्वाधिक रकमेचा जाहिरात करार करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये आपल्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखल्या जाणारे ज्योतिष नरेंद्र बुंदे यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदासुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे मापदंड कायम करणे सुरू ठेवणार असल्याचे सांगताना विराट भारतीय क्रीडा क्षेत्र व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी ऐकल्या न गेलेल्या मोठ्या रकमेचा जाहिरात करार करणार असल्याचे भविष्य वर्तविले आहे.
गेल्या वर्षी ज्यावेळी लोक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित करीत होते. त्यावेळी नागपूरच्या या ज्योतिषाने ३६ वर्षीय धोनी इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेत खेळणार असल्याचे म्हटले होते. बुंदे यांच्या ताज्या भविष्यावाणीनुसार कोहली २०२५ पर्यंत टी-२० विश्वकप व वन-डे विश्वकप विजेता ठरण्यासोबतच सचिन तेंडुलकरचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही मोडेल.
बुंदे म्हणाले,‘आतापर्यंत मी वर्तविलेली सर्व भाकिते खरी ठरले आहेत. विराट २०२५ पर्यंत टी-२० व वन-डे विश्वकप जिंकण्यासोबतच तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकतो. विराट यंदा मोठ्या रकमेचा जाहिरात करार करेल. मार्क मॅस्करेनहासच्या वर्ल्डटेलने सचिन तेंडुलकरसोबत जसा करार केला होता तशा प्रकारचा हा करार राहील, पण या करारात त्याला तेंडुलकरपेक्षा मोठी रक्कम मिळेल.’
तेंडुलकर १९९० च्या दशकात शानदार कामगिरी करीत होता. त्यावेळी मॅस्करेनहासने सेलेब्रिटी व्यवस्थापनाचे निकष बदलताना या क्रिकेट स्टारसोबत कोट्यवधी रुपयांचा करार केला होता. (वृत्तसंस्था)
बुंदे यांनी या व्यतिरिक्त
दिग्गज सचिन तेंडुलकरचे दुखापतीनंतर पुनरागमन, भारतरत्न सन्मान, माजी कर्णधार सौरव गांगुलीचे पुनरागमन आणि २०११ च्या विश्वविजेतेपदाचे अचूक भाकीत वर्तविले होते. आता विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यशस्वी ठरण्याची वेळ आली असल्याचे बुंदे यांनी म्हटले आहे. बुंदे यांनी अनेक क्रिकेटपटूंना सल्ला दिला आहे. त्यात गांगुली, मुरली कार्तिक, एस. श्रीसंत, झहीर खान, गौतम गंभीर व सुरेश रैना यांचा समावेश आहे.

Web Title: Kohli has the highest amount of advertising contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.