कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज - सलीम दुर्राणी 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सध्याचा सर्वाेत्तम फलंदाज आहे. त्याने जगातील वेगवेगळ्या परिस्थितीत आक्रमक व अभेद्य तंत्राने खो-याने धावा फटकावताना स्वत:ला सिद्ध केले आहे. तो आणखी दहा वर्षे तर नक्कीच खेळेल; परंतु त्यासाठी तो स्वत:ची तंदुरुस्ती कशी राखतो हे महत्त्वाचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:00 AM2018-02-03T02:00:06+5:302018-02-03T02:00:31+5:30

whatsapp join usJoin us
Kohli is the best batsman in the world - Salim Durrani | कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज - सलीम दुर्राणी 

कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज - सलीम दुर्राणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद  - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सध्याचा सर्वाेत्तम फलंदाज आहे. त्याने जगातील वेगवेगळ्या परिस्थितीत आक्रमक व अभेद्य तंत्राने खोºयाने धावा फटकावताना स्वत:ला सिद्ध केले आहे. तो आणखी दहा वर्षे तर नक्कीच खेळेल; परंतु त्यासाठी तो स्वत:ची तंदुरुस्ती कशी राखतो हे महत्त्वाचे आहे, असे मत भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्राणी यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद येथे अ.भा. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते येथे आले. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी आपली मते मांडली. भारतीय क्रिकेटमधील पहिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित दुर्राणी यांनी द. आफ्रिकेविरुद्धच्या दौºयाविषयी म्हटले की, परदेशातील खेळपट्टीवर भारतीय संघाने कमी सामने जिंकले आहेत. याविषयी निवड समिती, संघ व्यवस्थापनाने विचार करायला हवा. जय पराजय हा खेळाचा भाग आहे; परंतु आफ्रिका दौºयावर भारताने एक महिना आधीच तेथे जाऊन सराव सामने खेळायला हवे होते. त्याचा भारतीय संघाला फायदा झाला असता.’ तथापि, अजिंक्य रहाणेला संघात स्थान न देण्याविषयी छेडले असता ते म्हणाले की, ‘अजिंक्य रहाणे हा दर्जेदार फलंदाज आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याला न घेण्याचा निर्णय काही कारणामुळे निवड समितीने घेतला असावा. रोहित शर्मा हादेखील भारतीय संघातील एक दर्जेदार फलंदाज आहे. तो वनडेत खूप चांगला खेळतो. कसोटीतही त्याने शतके झळकावली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौºयात कसोटीत स्वत:ला सिद्ध करायला हवे होते. कसोटीत भरीव कामगिरी न करता येण्याविषयी त्याने स्वत: विचार करायला हवा आणि सुनील गावस्कर, चंदू बोर्डे आणि राहुल द्रविड यांच्याशी याविषयी चर्चा करायला हवी. हार्दिक पांड्याने आपल्याला प्रभावित केले आहे. तो मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. भारताचे महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव यांच्या पावलावर तो पाऊल ठेवत आहे. त्याच्या रूपाने भारताला दुसरा कपिलदेव मिळाला.’

Read in English

Web Title: Kohli is the best batsman in the world - Salim Durrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.