कोहली ठरला आकर्षणाचे केंद्र

सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेला कर्णधार विराट कोहली मंगळवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख केंद्र ठरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:13 AM2018-06-13T05:13:38+5:302018-06-13T05:13:38+5:30

whatsapp join usJoin us
Kohli became the attraction center | कोहली ठरला आकर्षणाचे केंद्र

कोहली ठरला आकर्षणाचे केंद्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु - सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेला कर्णधार विराट कोहली मंगळवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख केंद्र ठरला. कोहलीला गेल्या दोन मोसमातील शानदार कामगिरीसाठी पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंशुमान गायकवाड आणि सुधा शाह यांना यावेळी सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने २०७-१७ आणि २०१७-१८ या मोसमामध्ये एकहाती वर्चस्व राखले. सध्या आयपीएलमध्ये झालेल्या मानेच्या दुखापतीतून सावरत असलेल्या कोहलीवर उपचार सुरु असून यामुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघारही घ्यावी लागली. १५ जूनला कोहलीच्या तंदुरुस्तीची चाचणी होईल. (वृत्तसंस्था)

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अफगाणिस्तानच्या संघाचीही विशेष उपस्थिती होती. गुरुवारपासून अफगाणिस्तान भारताविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार असून हा त्यांचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने यावेळी एमएके पतौडी व्याख्यान दिले. या सोहळ्याच्या निमित्ताने माजी क्रिकेटपटू आणि नव्या दमाचे खेळाडू एकाच छताखाली उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे जलज सक्सेना, परवेझ रसूल आणि कृणाल पांड्या यांना देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Web Title: Kohli became the attraction center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.