पाकिस्तानच्या इमाम उल हकने मोडला कपिल देव यांचा वर्ल्डकपमधला विक्रम

इमामने १५१ धावांची खेळी साकारताना भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा विश्वचषकातील विक्रम मोडीत काढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:18 PM2019-05-15T19:18:33+5:302019-05-15T19:20:07+5:30

whatsapp join usJoin us
Kapil Dev's record in world cup broken Pakistan's Imam al Haq | पाकिस्तानच्या इमाम उल हकने मोडला कपिल देव यांचा वर्ल्डकपमधला विक्रम

पाकिस्तानच्या इमाम उल हकने मोडला कपिल देव यांचा वर्ल्डकपमधला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात इमाम-उल-हक या सामन्यात चांगलाच खेळला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज माघारी गेले असताना इमामने धैर्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत 151 धावांची खेळी साकारली. त्याने 131 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकार खेचला. इमामने १५१ धावांची खेळी साकारताना भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा विश्वचषकातील विक्रम मोडीत काढला आहे.

कपिल देव यांनी १९८३ साली झालेल्या विश्वचषकात कपिल यांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात नाबाद १७५ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. त्यावेळी कपिल यांचे वय २४ वर्षे होते. त्यानंतर त्यांचा हा विक्रम गेली ३६ वर्षे अबाधित होता. त्यानंतर इमामने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इमामने १५१ धावांची खेळी साकारली. त्याचे वय २३ वर्षे आहे. त्यामुळे दीडशतकी खेळी साकारणारा सर्वात युवा खेळाडू इमाम ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कपिल यांच्या नावावर होता.

इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान संघाला धू धू धुतले
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वन डे सामन्यांतील धावांतून त्याची प्रचिती येत आहे. पाकिस्तानने उभे केलेले 358 धावांचे लक्ष्य इंग्लंडच्या खेळाडूंनी 6 विकेट आणि 31 चेंडू राखून सहज पार केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये धावांचा रतीब रचणाऱ्या जॉनी बेअरस्टोची बॅट राष्ट्रीय संघाकडूनही चांगलीच तळपली. त्याच्या तुफानी खेळीला अन्य फलंदाजांची तोडीस तोड साथ मिळाली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडने 2-0 असी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानचा हा वन डेतील सलग सातवा फराभव आहे आणि विशेष म्हणजे या सातही सामन्यांत त्यांच्या संघात एक शतकवीर राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडने या वर्षात तिसऱ्यांदा 350 हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला आहे.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला.  इमाम-उल-हक या सामन्यात चांगलाच खेळला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज माघारी गेले असतान इमामने धैर्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत 151 धावांची खेळी साकारली. त्याने 131 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकार खेचला. त्याला हॅरिस सोहैल ( 41) व आसीफ अली ( 52) यांची उत्तम साथ लाभली.
पण, हे मोठे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी दीडशतकी भागीदारी करून देताना इंग्लंडला मजबूत पाया रचून दिला. रॉयने 55 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. त्यानंतर बेअरस्टोनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 93 चेंडूंत 15 चौकार व 5 षटकार खेचत 128 धावा चोपल्या. त्याला जो रूट ( 43), बेन स्टोक्स ( 37) आणि मोईन अली ( 46*) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडने 44.5 षटकांत 4 फलंदाज गमावून हे लक्ष्य पार केले.

Web Title: Kapil Dev's record in world cup broken Pakistan's Imam al Haq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.