केदार जाधव बॉलीवूडमध्ये करू शकतो पदार्पण...

ड्रेसिंग रुममध्ये केदारचा अभिनय पाहून टीम इंडियातील खेळाडूंबरोबरच चाहतेही त्याच्यावर खूष झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:52 PM2018-09-24T16:52:57+5:302018-09-24T16:53:40+5:30

whatsapp join usJoin us
Kadar Jadhav can make debut in Bollywood ... | केदार जाधव बॉलीवूडमध्ये करू शकतो पदार्पण...

केदार जाधव बॉलीवूडमध्ये करू शकतो पदार्पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकेदार जाधवचा ड्रेसिंग रुममधला अभिनय पाहा

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये चमक दाखवताना दिसत आहे. पण केदार हा चांगला अभिनेताही आहे, हे तुम्हाला माहिती नसेल. ड्रेसिंग रुममध्ये केदारचा अभिनय पाहून टीम इंडियातील खेळाडूंबरोबरच चाहतेही त्याच्यावर खूष झाले आहेत. त्यामुळे केदारने आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकतो, असे मत चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

ड्रेसिंग रुममध्ये केदार एकदा गिटार वाजवण्याचा अभिनय करत होता. त्याने बॅट गिटारसारखी आपल्या हातामध्ये धरली होती आणि तो आपण वादक असल्याचा अभिनय करत होता. एखाद्या कार्यक्रमात गिटार वादक जसे संगीत देत असतात, अगदी तशीच गोष्ट केदार करत होता. त्यामुळेच चाहत्यांनी त्याच्या या अभिनयाला पसंती दर्शवली आहे.

केदार जाधवचा ड्रेसिंग रुममधला अभिनय पाहा


Web Title: Kadar Jadhav can make debut in Bollywood ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.