कसोटी संघात जसप्रीत बुमराहची जागा नाही ? माजी महान खेळाडूने उपस्थित केले सवाल

भारतीय टीमने दक्षिण अफ्रीकेविरोधातील कसोटी मालिका गमावली असली तरी संघाच्या गोलंदाजांचं सर्वच स्थरांतून कौतूक होत आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिकेट दिग्गज हैराण झाले.  या मालिकेत पदार्पण करणा-या जसप्रीत बुमराहने दुस-या कसोटीतच 5 विकेट घेतल्या आणि आपली छाप सोडली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 02:03 PM2018-01-30T14:03:04+5:302018-01-30T14:33:22+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah's Style Isn't Suited for English Conditions, Believes Michael Holding | कसोटी संघात जसप्रीत बुमराहची जागा नाही ? माजी महान खेळाडूने उपस्थित केले सवाल

कसोटी संघात जसप्रीत बुमराहची जागा नाही ? माजी महान खेळाडूने उपस्थित केले सवाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग भारतीय टीमने दक्षिण अफ्रीकेविरोधातील कसोटी मालिका गमावली असली तरी संघाच्या गोलंदाजांचं सर्वच स्थरांतून कौतूक होत आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाने क्रिकेट दिग्गज हैराण झाले.  या मालिकेत पदार्पण करणा-या जसप्रीत बुमराहने मालिकेतील दुस-या कसोटीत 5 विकेट घेतल्या आणि आपली छाप सोडली. 
क्रिकेटचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्याचं कौतूक करत असताना वेस्ट इंडिजचे माजी महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी मात्र त्याच्या टेस्ट करिअरबाबत मोठं विधान केलं आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौ-यासाठी बुमराहचा टीममध्ये समावेश व्हायला नको, तो टीममध्ये खेळण्यास योग्य नाही असं म्हणत  त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 
''जसप्रीत बुमराह इंग्लंडमध्ये चांगली गोलंदाजी करू शकत नाही, नव्या चेंडूने तेथील खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याची बुमराहची क्षमता नाही. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांपेक्षा इंग्लंडच्या खेळप्ट्टाय ब-याच वेगळ्या असतात. मी भारतीय संघाचा कर्णधार असतो तर इंग्लंड दौ-यात बुमराहला टीममध्ये घेतलं नसतं. खेळपट्टीवर चेंडू पुढे टाकण्यास बुमराह सक्षम नाही. आफ्रिकेविरोधातील मालिकेत बुमराहने जास्तीत जास्त चेंडू खाली जोरात आपटण्याचं काम केलं. एखादा जलदगती गोलंदाज कधीच अशी चूक करणार नाही. चेंडू पुढे टाकण्याचा सराव बुमराहला करावा लागेल. मी बुमराहला संधी देणार नाही, तेथील खेळपट्ट्यांवर चेंडू आपटणारा नाही तर खेळपट्टीवरून चेंडूची दिशा बदलवू शकेल अशा गोलंदाजांची गरज आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर खेळताना कधीही मी भुवनेश्वर कुमारची सर्वात आधी निवड करेल. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर मी भुवनेश्वर नंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीचा विचार करेल. मी बुमराहला संधी देणार नाही'' असं होल्डिंग म्हणाले. 
आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांपेक्षा इंग्लंडच्या खेळपट्ट्या ब-याच वेगळ्या असतील त्यामुळे कर्णधार कोहलीने आपल्या जलदगती गोलंदाजांकडून योग्य ती तयारी करून घेणं उपयुक्त ठरेल असा सल्लाही होल्डिंगने कॅप्टन कोहलीला दिला.  
63 वर्षांच्या मायकल होल्डिंग यांच्या आग ओकणा-या चेंडूंची दहशत जवळपास सर्वच फलंदाजांमध्ये होती. त्यांनी केवळ 60 कसोटी सामन्यात 249 विकेट आपल्या नावे केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर होल्डिंग हे समालोचकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात.  

Web Title: Jasprit Bumrah's Style Isn't Suited for English Conditions, Believes Michael Holding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.