IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला वन डे मालिकेतून विश्रांती, मोहम्मद सिराजला संधी 

IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला आगामी वनडे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 10:54 AM2019-01-08T10:54:46+5:302019-01-08T10:57:14+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah has been rested for the upcoming ODI series against Australia and India's Tour of New Zealand | IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला वन डे मालिकेतून विश्रांती, मोहम्मद सिराजला संधी 

IND vs AUS ODI : जसप्रीत बुमराला वन डे मालिकेतून विश्रांती, मोहम्मद सिराजला संधी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताच्या वनडे व ट्वेंटी संघात बदलमोहम्मद सिराज वन डे, तर सिद्धार्थ कौल ट्वेंटी-20 संघातभारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेला 12 जानेवारीपासून सुरुवात

मुंबई : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेल्या जसप्रीत बुमराला आगामी वनडे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे.  भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले. या मालिकेत बुमराने सर्वाधिक 21 विकेट घेतल्या आहेत. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ यापूर्वीच जाहीर केला होता. मात्र, मे महिन्यापासून सुरू होणारी वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यापूर्वी होणारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) यामुळे बुमरावर येणारा ताण लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी सिद्धार्श कौलला पाचारण करण्यात आले आहे. 


असा असेल संघ
वन डे संघः विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी
ट्वेंटी-20 संघः  विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक,  केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद. 

Web Title: Jasprit Bumrah has been rested for the upcoming ODI series against Australia and India's Tour of New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.