जडेजाला अव्वल स्थान पटकावण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी अपेक्षित

अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे १६ नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये प्रारंभ होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाज व अष्टपैलू मानांकनामध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:39 AM2017-11-15T00:39:38+5:302017-11-15T00:40:42+5:30

whatsapp join usJoin us
 Jadeja will have the opportunity to win the top spot, good performance against Sri Lanka | जडेजाला अव्वल स्थान पटकावण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी अपेक्षित

जडेजाला अव्वल स्थान पटकावण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी अपेक्षित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे १६ नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये प्रारंभ होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाज व अष्टपैलू मानांकनामध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.
जडेजाने ३२ कसोटी सामन्यात १५५ बळी घेतले आहेत. या व्यतिरिक्त त्याने ११३६ धावाही फटकावल्या आहेत. २८ वर्षीय हा खेळाडू दोन्ही विभागात मानांकनामध्ये दुसºया स्थानी आहे.
गोलंदाजी मानांकनामध्ये जडेजा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनपेक्षा १२ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तो बांगलादेशच्या शाकिब-अल-हसनपेक्षा ८ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. जडेजाने या मालिकेत जर गोलंदाजी व फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली तर तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसºया लढतीनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावू शकतो. गोलंदाजी मानांकनामध्ये तो ९ सप्टेंबरपर्यंत अव्वल स्थानी होता. अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या लढतीनंतर अव्वल स्थान पटकावले होते.
जडेजाव्यतिरिक्त फलंदाजी रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेल्या कर्णधार कोहलीला अव्वल पाच फलंदाजांमध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे. कोहली आॅस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या तुलनेत एका गुणाने पिछाडीवर आहे.
अव्वल १० मध्ये लोकेश राहुल (आठवे स्थान) आणि अजिंक्य रहाणे (नववे स्थान) यांचा समावेश आहे. मानांकनामध्ये पिछाडीवर असलेल्या दुसºया अन्य फलंदाजांमध्ये शिखर धवन (३० वे स्थान), मुरली विजय (३६ वे स्थान) आणि यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (४७ वे स्थान) यांचा समावेश आहे. गोलंदाजी मानांकनामध्ये रविचंद्रन अश्विन चौथ्या, मोहम्मद शमी १९ व्या, उमेश यादव २७ व्या, ईशांत शर्मा २९ व्या आणि भुवनेश्वर कुमार ३७ व्या स्थानी आहेत. श्रीलंकेचा एकही फलंदाज अव्वल १० मध्ये नाही. दिमुथ करुणारत्ने १७ व्या, कर्णधार दिनेश चांदीमल २०व्या स्थानासह अव्वल वीसमध्ये आहेत तर अँजेलो मॅथ्यूज २४ व्या, निरोशन डिकवेला ४० व्या, दिलरुवान परेरा ७८ व्या आणि लाहिरू थिरिमाने ११३ व्या स्थानी आहे.(वृत्तसंस्था)

Web Title:  Jadeja will have the opportunity to win the top spot, good performance against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.