विराट कोहलीला गोलंदाजी करणं मलाही कठीण गेलं असतं - वसीम अक्रम

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 12:16pm

मायकल क्लार्क, जावेद मियादाद नंतर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमही विराट कोहलीचे गुणगान गात आहे.

नवी दिल्ली - केपटाऊनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या 160 धावांच्या जबरदस्त खेळीनंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गज त्याचे चाहते झाले असून, कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मायकल क्लार्क, जावेद मियादाद नंतर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमही विराट कोहलीचे गुणगान गात आहे. भारताचा रन मशीन विराट कोहलीसमोर गोलंदाजी करणं आपल्यालाही कठीण झालं असतं असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रमने विराट कोहलीची स्तुती केली आहे. विराट कोहलीने फिटनेसला एका वेगळ्या उंचीवर नेलं असल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. वसीम अक्रम बोलला आहे की, 'नक्कीच फिटनेस अत्यंत महत्वाचा आहे. एका ठराविक वयानंतर फलंदाज दक्ष होतो आणि त्याला आपण कशाप्रकारे धावा करु शकतो याचा अंदाज येतो. मला वाटतं कोहलीला दोन ते तीन वर्षांपुर्वीच आपण कोणते शॉट खेळले पाहिजेत आणि कशाप्रकारे जास्तीत जास्त धावा करु शकतो याचा अंदाज आला होता, आणि त्याप्रमाणे त्याने खेळण्यास सुरुवात केली'. 

एकेकाळचा महान गोलंदाज ठरलेल्या वसीम अक्रमने ही गोष्टदेखील मान्य केली की, मला स्वत:लादेखील विराटसमोर गोलंदाजी करणं कठीण गेलं असतं. वसीम अक्रमने म्हटलं आहे की, 'विराट कोहलीला खेळताना पाहणं आनंद देतं. जर मी तरुण असतो आणि विराट कोहलीसमोर गोलंदाजी करण्याची वेळ आली असती, तर नेमका कुठे बॉल टाकायचा हा प्रश्न पडला असता. कोणत्याही प्रकारची खेळपट्टी असो, कोहलीला फरक पडत नाही कारण तो एक संपुर्ण खेळाडू आहे. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर आता त्यांचा क्रमांक आहे'.

दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यातील विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीवर बोलताना वसीम अक्रमने म्हटलं की, 'कोहली प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. धावांचा पाठलाग करताना त्याने केलेले रेकॉर्ड्स आपण पाहिलेच आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो 90 च्या सरासरीने धावा करत आहे आणि आता त्याने 160 धावांनी नाबाद खेळी केली आहे'.  

संबंधित

विराट कोहली चांगला लीडर, पण सर्वोत्तम कर्णधार नाही... सांगतोय शेन वॉर्न
India vs New Zealand 3rd T20 : रोहित शर्माला कॅप्टन कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची संधी
कोहली, धोनी अन् आशिया DJ Bravoचं नवं गाणं, पाहा व्हिडीओ..
India vs New Zealand T20 : कॅप्टन कोहली, धोनी यांना मागे टाकून हिटमॅन रोहित शर्मा टॉप!
सिंधूने केला चिनी कंपनीशी करार, थेट कोहलीशी केली बरोबरी

क्रिकेट कडून आणखी

भारताला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनीती
कोहली आणि डी' व्हिलियर्सच्या पोस्टरवर केला अभिषेक, व्हिडीओ झाला वायरल
पुलवामा हल्ला: आता भारताच्या स्टेडियम्समधूनही काढले जात आहेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार का?; अंतिम निर्णय सरकारचा!
वर्ल्ड कपमध्ये कोहली 'वन डाऊन' येणार नाही; रवी शास्त्रींच्या 'प्लॅन'ला निवड समितीचाही पाठिंबा

आणखी वाचा