इरफानचा बडोद्याला रामराम, काश्मीरकडून खेळणार

भारतीय संघाबाहेर असलेला माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने क्रिकेट कारकिर्दीला नव्याने उभारी देण्याची तयारी चालविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 10:12 PM2018-01-26T22:12:02+5:302018-01-26T22:12:30+5:30

whatsapp join usJoin us
Irfan will play Baroda in Ramram, Kashmir | इरफानचा बडोद्याला रामराम, काश्मीरकडून खेळणार

इरफानचा बडोद्याला रामराम, काश्मीरकडून खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: भारतीय संघाबाहेर असलेला माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने क्रिकेट कारकिर्दीला नव्याने उभारी देण्याची तयारी चालविली आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून खेळून भारतीय संघाचा एकेकाळी स्टार मानला गेलेला हा डावखुरा गोलंदाज यापुढे रणजी करंडकासह इतर सामन्यात जम्मू-काश्मीरकडून खेळू इच्छितो.

इरफान आगामी ३ वर्षांसाठी जम्मू-काश्मीरकडून खेळताना दिसेल तर नवल वाटू नये. जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेचे विशेष कार्यकारी अधिकारी आशिक अली बुखारी यांनी यासंदर्भात इरफानला आॅफर दिली आहे. बुखारी यांच्यानुसार, आपण इरफान पठाणशी चर्चा केली. इरफानने आॅफरही स्वीकारली आहे. माजी कर्णधार कपिल देव यांनाही जम्मू-काश्मीरच्या प्रशिक्षकपदाची आॅफर देण्यात आली असल्याचे बुखारी यांनी सांगितले.
‘संघासाठी आम्ही अष्टपैलू खेळाडूंच्या शोधात होतो. यासाठी इरफान पठाणला आमची पहिली पसंती होती. आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी सामन्यांकडे इरफानचा अनुभव पाहता, तो आमच्या संघाला वर आणण्यास मदत करू शकतो. इरफानच्या सोबतीने इतर खेळाडूंचा खेळही सुधारेल, अशी आशा आहे.’

इरफान पठाणनेही आपल्याला जम्मू-काश्मीरकडून खेळण्याची संधी आल्याचे मान्य केले. जम्मू-काश्मीरकडून खेळण्यासाठी मी बडोदा क्रिकेट असोसिएशनचे नाहरकत प्रमाणपत्रही मिळविले आहे. त्यामुळे यासंदर्भात अंतिम निर्णय आगामी दोन-तीन दिवसांत होईल, असे इरफान पठाणने स्पष्ट केले. इरफान पठाणने आतापर्यंत २९ कसोटी आणि १२० वन-डे सामन्यांमध्ये भारताच प्रतिनिधित्व केले आहे.

Web Title: Irfan will play Baroda in Ramram, Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.