आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’

आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:46 AM2019-03-23T05:46:36+5:302019-03-23T05:46:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL's 'Mahasangram' from today, Opening Dhoni's SuperKing's 'Challenge' ahead of Bangalore's Virat Kohli | आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’

आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई - आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी आशा आहे. दरम्यान, या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव केला.
कोहली अ‍ॅन्ड कंपनीने धोनीच्या धुरंधरांना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली तर बेंगळुरुसाठी हा सर्वांत मोठा श्रीगणेशा ठरणार आहे. चेन्नई संघात ३० वर्षांवरील खेळाडू आहेत. धोनी आणि शेन वॉटसन हे दोघे ३७, तर ड्वेन ब्राव्हो ३५, फाफ डुप्लेसिस ३४ तसेच अंबाती रायुडू आणि केदार जाधव ३३, सुरेश रैना ३२, फिरकीपटू इम्रान ताहिर ३९ आणि हरभजनसिंग ३८ वर्षांचा आहे. राष्टÑीय संघाबाहेर असलेला कर्ण शर्मा ३१ आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा ३० वर्षांचा आहे. या संघाने वयावर मात करीत आयपीएलचे सामने गाजविले हे विशेष. नेहमी अव्वल चार संघात राहून चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधीही दिली. चेन्नई संघ तीनवेळेचा विजेता असला तरी बेंगळुरू संघात अनेक दिग्गज आहेत पण एकदाही त्यांना जेतेपद पटकविता आले नाही. पहिल्या सामन्याचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर तसेच दडपण झेलण्याच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विसंबून असेल.
चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा हे तसेच बेंगळुरु संघातून वेगवान उमेश यादव चांगल्या कामगिरीच्या बळावर विश्वचषकासाठी राष्टÑीय संघात स्थान मिळविण्यास इच्छुक आहेत. (वृत्तसंस्था)

प्रसारणावर पाकिस्तानात बंदी

पाकिस्तान सुपर लीगदरम्यान भारतीय कंपन्या आणि सरकारने आम्हाला जी वागणूक दिली त्याचा बदला म्हणून पाकिस्तानमध्ये आयपीएल सामने दाखवले जाणार नाहीत, असा पवित्रा पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी घेतला आहे. चौधरी म्हणाले, ‘आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र, भारताने ‘आर्मी कॅप’ घालून सामना खेळला, तरीही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

भारतीय कंपनी आयएमजी रिलायन्सने पीएसएलदरम्यान टीव्ही प्रसारण करार मोडीत काढला. त्यामुळे स्पर्धेदरम्यान नव्या कंपनीसोबत करार करावा लागला होता.
बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डामध्ये सुरू असलेल्या वादात पीसीबीला आयसीसी सुनावणीत हार पत्करावी लागली. यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे सामने पाकिस्तानात प्रसारित केले जाणार नाहीत, असा निर्णय घेतला. एआरवाय या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी ही माहिती दिली.

उभय संघ यातून निवडणार

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वाटसन, फाफ डुप्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, रितुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजनसिंग, मिशेल सेंटनेर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के एम आसिफ, डेव्हिड विले, दीपक चहार, एन. जगदीशन.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ए बी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मार्कस स्टोयनिस, शिमरोन हेटमायेर, शिवम दुबे, नाथन कूल्टर नाईल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासेन, मोईन अली, कोलिन डि ग्रॅन्डहोमे, पवन नेगी, टिम साऊदी, अक्षदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदत्त पी, गुरकीरतसिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी आणि हिम्मतसिंग.

सामना : रात्री ८ पासून । स्थळ : चेपॉक स्टेडियम चेन्नई

Web Title: IPL's 'Mahasangram' from today, Opening Dhoni's SuperKing's 'Challenge' ahead of Bangalore's Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.