IPL Retention: Dhoni and Kohli will be in the squad | आयपीएल रिटेंशन : धोनी, कोहली संघात कायम, आज मुंबईत होणार खेळाडूंची घोषणा

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गुरुवारी आयपीएलमधील अशा खेळाडूंच्या नावांची घोषणा करणार आहे, ज्यांना आगामी सत्रापासून फ्रेंचाईजींनी आपल्या संघात कायम ठेवले आहे. यानुसार भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे स्थान अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लीगमध्ये पुनरागमन करीत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात कायम राहणार असल्याचे निश्चित आहे.
टीम इंडियाचे नेतृत्व करत असताना कोहली यशस्वी ठरला असेल, परंतु आतापर्यंत तो आरसीबीला आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. त्याचवेळी, गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सला तिसरे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचेही स्थान कायम असल्याचे मानले जात आहे. शिवाय गेल्या दोन मोसमात गुजरात लायन्सकडून खेळलेला रवींद्र जडेजाही चेन्नई सुपरकिंग्जमध्ये परतेल.
सनरायझर्स हैदराबादही आपला धडाकेबाज सलामीवीर आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरला कायम ठेवणार असल्याचे निश्चित आहे. त्याचवेळी, चेन्नईसह दोन
वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेलेला राजस्थान रॉयल्स संघ कर्णधार स्टीव्ह स्मिथबाबत काय निर्णय घेईल, याकडेही विशेष लक्ष लागले आहे.
चेन्नई आणि राजस्थानसाठी २०१५ खेळलेले आणि २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स किंवा गुजरात लायन्सकडून खेळलेले खेळाडूच रिटेंशन किंवा आरटीएमसाठी उपलब्ध असतील.

प्रत्येक संघ पाच खेळाडूंची निवड करू शकतात
सहा डिसेंबरला दिल्लीमध्ये आयपीएल संचालन परिषदेच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक संघ ‘रिटेंशन आणि राइट टू मॅच’ अंतर्गत पाच खेळाडूंची निवड करू शकतात. त्याचवेळी प्रत्येक फ्रेंचाईजीकडे अधिकार असतील, की ते जास्तीत जास्त तीन रिटेंशन किंवा तीन आरटीएम खेळाडू निवडू शकतात. खेळाडूंच्या मुख्य लिलावापूर्वी फ्रेंचाइजीने कोणतेही रिटेंशन घेतले नाही, तर ते तीन आरटीएम घेऊ शकतात.


Web Title:  IPL Retention: Dhoni and Kohli will be in the squad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.