आयपीएल : युवी, गेल, वॉटसन, रुट यांच्यावर बोली लागणार; ११२२ खेळाडू पंजीबद्ध, २७, २८ जानेवारीला बंगळुरूत लिलाव

युवराजसिंग, ख्रिस गेल, ज्यो रुट आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या स्टार्सवर बंगळुरू येथे २७ आणि २८ जानेवारीला होणा-या आयपीएल लिलावात बोली लावली जाईल. एकूण ११२२ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असून ८३८ नवे चेहरे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:53 AM2018-01-14T04:53:08+5:302018-01-14T04:53:21+5:30

whatsapp join usJoin us
IPL: Gav, Watson, Root; 1122 players registered, auctioned in Bangalore on 27th and 28th January | आयपीएल : युवी, गेल, वॉटसन, रुट यांच्यावर बोली लागणार; ११२२ खेळाडू पंजीबद्ध, २७, २८ जानेवारीला बंगळुरूत लिलाव

आयपीएल : युवी, गेल, वॉटसन, रुट यांच्यावर बोली लागणार; ११२२ खेळाडू पंजीबद्ध, २७, २८ जानेवारीला बंगळुरूत लिलाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : युवराजसिंग, ख्रिस गेल, ज्यो रुट आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या स्टार्सवर बंगळुरू येथे २७ आणि २८ जानेवारीला होणा-या आयपीएल लिलावात बोली लावली जाईल. एकूण ११२२ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली असून ८३८ नवे चेहरे आहेत. ७७८ भारतीय तसेच तीन सहयोगी देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. नोंदणीत भारतासाठी खेळलेल्या २८१ खेळाडूंचा समावेश आहे.
विदेशी खेळाडूंमध्ये आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा ज्यो रुट, बेन स्टोक्स, ख्रिस लीन, इयान मॉर्गन, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स आकर्षण असतील.
विंडीजच्या खेळाडूंमध्ये ड्वेन ब्राव्हो, कार्लोस ब्रेथवेट, एव्हिन लुईस आणि जेसन होल्डर यांचा, तसेच द. आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये हाशिम अमला, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, मोर्ने मोर्कल व कागिसो रबाडा यांचा
समावेश आहे. न्यूझीलंडकडून केन विल्यम्सन, कॉलिन मुन्रो, टॉम लॅथम लिलावासाठी उपलब्ध राहणार आहे. अफगाणिस्तानचे १३, बांगलादेशाचे आठ, आयर्लंडचे दोन, झिम्बाब्वेचे सात आणि अमेरिकेचे दोन खेळाडू नशीब आजमावणार आहेत. (वृत्तसंस्था)

- आयपीएलच्या आठही फ्रॅन्चायसींना खेळाडूंची यादी पाठविण्यात आली असून गौतम गंभीर, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, कुलदीप यादव, मुरली विजय, लोकेश राहुल यांच्यावरही बोली लावली जाईल.
- २८२ विदेशी खेळाडूंमध्ये आॅस्ट्रेलियाचे ५६, द. आफ्रिकेचे ५७, श्रीलंका
आणि विंडीजचे प्रत्येकी ३९, न्यूझीलंडचे ३० आणि इंग्लंडच्या २६ जणांचा
समावेश आहे.

Web Title: IPL: Gav, Watson, Root; 1122 players registered, auctioned in Bangalore on 27th and 28th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.