IPL Auction 2019 : आयपीएलचा असाही धक्का; एकही बळी न टिपणारा यष्टीरक्षक ठरला 4.20 कोटींची धनी

फक्त पाच ट्वेन्टी-20 सामने त्याच्या नावावर आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याने वेस्ट इंडिजकडून एकही झेल पकडलेला नाही. पण यंदाच्या लिलावात तब्बल 4.20 टी रुपयांचा मालक ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 04:55 PM2018-12-18T16:55:35+5:302018-12-18T16:57:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL auction 2019: Auspicious push of IPL; No wicket taken by wicket keeper but get 4.20 crores in ipl auction | IPL Auction 2019 : आयपीएलचा असाही धक्का; एकही बळी न टिपणारा यष्टीरक्षक ठरला 4.20 कोटींची धनी

IPL Auction 2019 : आयपीएलचा असाही धक्का; एकही बळी न टिपणारा यष्टीरक्षक ठरला 4.20 कोटींची धनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : एखादा खेळाडू देशाकडून खेळला की तो क्रिकेट विश्वामझ्ये परीचयाचा होतो. पण वेस्ट इंडिजकडून फक्त पाच सामने खेळणारा आणि त्यामध्ये 82 धावा काढणारा एक खेळाडू आयपीएलच्या लिलावात तब्बल 4.20 कोटी रुपयांचा मालक झाला आहे. आयपीएलमधील हा सर्वात धक्कादायल निकाल असल्याचे म्हटले जात आहे. काही वर्षांपूर्वी देशाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न खेळाडू बाळगत होते. पण आता देशाकडून न खेळताही खेळाडू करोडपती होऊ शकतो, हे आयपीएलने दाखवून दिले आहे. कारण आयपीएलमध्ये खेळाडू कोणत्या देशाचा आहे यापेक्षा त्याची कामगिरी स्थानिक क्रिकेटमध्य कशी झाली, हे पाहिले जाते.

निकोलस पुरन... हा यंदाच्या लिलावात तब्बल 4.20 टी रुपयांचा मालक ठरला आहे. फक्त पाच ट्वेन्टी-20 सामने त्याच्या नावावर आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याने वेस्ट इंडिजकडून एकही झेल पकडलेला नाही. पण स्थानिक क्रिकेटमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो कडून खेळताना त्याची कामगिरी नेत्रदीपक अशीच झाली होती. त्यामुळे त्याला काही लीगमध्ये खेळायची संधी मिळाली होती. नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या टी-10 लीगमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती.

Nicholas Pooran is sold to @lionsdenkxip for INR 420 lacs

VIVO #IPLAuction

— IndianPremierLeague (@IPL) December 18, 2018

गेल्या वर्षीही पुरन हा आयपीएलच्या लिलावात सहभागी झाला होता. पण त्याला आपली मूळ किंमत असलेल्या 30 लाख रुपयांना मुंबई इंडियन्सने संघात घेतले होते. पण यावेळी तब्बल 14 पटीने त्याची किंमत वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी यंदा 4.20 कोटी रुपये मोजले आहेत.

Web Title: IPL auction 2019: Auspicious push of IPL; No wicket taken by wicket keeper but get 4.20 crores in ipl auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.