IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्व मोसमात खेळलेल्या खेळाडूंचे एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो एका खेळाडूचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 08:00 PM2018-01-30T20:00:05+5:302018-01-30T20:25:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2018: This is the only IPL player, playing for 11 years from a single team | IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून

IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु - नुकताच आयपीएलच्या 11 व्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव बंगळुरुमध्ये पार पडला. यामध्ये अनेक देशी-विदेशी खेळाडूंवर बोली लावण्यात आली. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्व मोसमात खेळलेल्या खेळाडूंचे एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो एका खेळाडूचा आणि हा खेळाडू म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली.

विराट आयपीएलमध्ये सर्व मोसमात एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. याआधी एमएस धोनी, सुरेश रैना हे सुद्धा चेन्नई सुपर किंग्स या एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू होते, परंतु 2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी या संघावर बंदी आल्याने या दोन्ही खेळाडूंना संघ बदलावा लागला होता.

विराटला 2008 साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने संघात समाविष्ट करून घेतले होते. विशेष म्हणजे याच वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. याच वर्षी वरिष्ठ भारतीय संघातही त्याचे पदार्पणही झाले होते. त्याच्या चांगल्या कामगिरीच्या वाढत्या आलेखामुळे तो कधीही बंगलोर संघातून बाहेर पडला नाही. तसेच काही वर्षातच त्याला बंगलोर संघाचे कर्णधारपदही मिळाले. कोहलीने 2013 साली बंगलोर संघाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगलोर संघाने 2016 साली आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण त्यांना सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2016 यावर्षीच्या आयपीएल मोसमात विराट सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही बनला होता. त्याने 82 च्या सरासरीने 973 धावा केल्या होत्या.

विराटने आतापर्यंत 149 आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने 37.44 च्या सरासरीने 4418  धावा केल्या आहेत. त्यात 4 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 113 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे त्याने त्याची चारही शतके 2016 च्या मोसमात झळकावली.

दरम्यान, आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेन उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथम कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. 

Web Title: IPL Auction 2018: This is the only IPL player, playing for 11 years from a single team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.