IPL Auction 2018 : एकेकाळी बीसीसीआयनं या खेळाडूवर आणली होती बंदी,  लिलावात झाला मालामाल

दुसऱ्या दिवशी आयपीएलच्या बोलीमध्ये त्याला आपल्या बेसप्राइज पेक्षा 31 पट आधिक रक्कम मिळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 05:40 PM2018-01-28T17:40:30+5:302018-01-28T17:40:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL auction 2018: gautham-krishnappa-fetches-a-bid-of-62-crores-from-his-base-price-of-20-lacs | IPL Auction 2018 : एकेकाळी बीसीसीआयनं या खेळाडूवर आणली होती बंदी,  लिलावात झाला मालामाल

IPL Auction 2018 : एकेकाळी बीसीसीआयनं या खेळाडूवर आणली होती बंदी,  लिलावात झाला मालामाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरु - गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये बीसीसीआयनं कर्नाटकच्या कृष्णप्पा गौतमवर बंदी घातली होती. बीसीसीआयला न सांगता कर्नाटक प्रीमियर लीगच्या टी-20 सामन्यामध्ये खेळल्यामुळं त्याच्यावर देशांतर्गत क्रिकट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर दिलीप ट्रॉफी आणि इंडिया ए कडून  खेळण्यावर प्रतिबंद घातले होते. दिलीप ट्राफीच्या पहिल्या सामन्यात इंडिया रेडकडून खेळताना पहिल्या सामन्यात त्यानं पाच विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं  होतं.  या सामन्यानंतर टायफॉड झाला असल्याचे कारण देत तो बंगळुरुला रवाना झाला होता. त्यानंतर तिथे जाताच कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाला. त्यामुळं बीसीसीआयनं त्याच्यावर बंदी घातली होती. बंदी घातल्यानंतर त्यानं बीसीसीआयची माफी मागितली. माफी मागितल्यानंतर त्याच्यावरील बंदी हटवण्यात आली. आणि त्याला रणजी संघात स्थान देण्यात आलं. 2017 मध्ये झालेल्या रणजी सामन्यात त्यानं उत्कृष्ट खेळीच प्रदर्षण करत  कर्नाटकला उपांत्या फेरीत दाखल केलं होतं. रणजीमध्ये त्यानं आठ सामन्यात 22.23 च्या सरासरीनं 34 विकेट मिळवल्या होत्या. 

दुसऱ्या दिवशी आयपीएलच्या बोलीमध्ये त्याला आपल्या बेसप्राइज पेक्षा 31 पट आधिक रक्कम मिळली. कर्नाटकच्या कृष्णप्पा गौतम या ऑफ स्पिनरला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्सनं बेस प्राइसपेक्षा तब्बल ६ कोटी रुपये जास्त मोजले. २०१७च्या आयपीएल स्पर्धेत कृष्णप्पा गौतम मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यावेळी मुंबईनं त्याच्यावर २ कोटींची बोली लावली होती. परंतु, यावर्षी त्याला आणखी मोठ्ठी लॉटरी लागलीय. कृष्णप्पाचा लिलाव सुरू झाला, तो २० लाखांच्या बेस प्राइसपासून. त्यानंतर, ही रक्कम वाढत वाढत ६ कोटी २० लाखांवर पोहोचली. शेवटची बोली राजस्थानची असल्यानं कृष्णप्पानं 'रॉयल' संघात थाटात प्रवेश केला. 

२०१६-१७च्या रणजी मोसमात गौतमनं दिल्ली आणि आसामविरुद्ध पाच-पाच विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावून आपलं फलंदाजीतील कौशल्यही सिद्ध केलं होतं. त्याच याच कामगिरीची दखल घेऊन राजस्थाननं एवढी किंमत मोजून त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आहे. 

Web Title: IPL auction 2018: gautham-krishnappa-fetches-a-bid-of-62-crores-from-his-base-price-of-20-lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.