IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या अव्वल दोन संघांमध्ये सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:43 PM2019-05-01T14:43:58+5:302019-05-01T14:44:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Suspense over MS Dhoni's availability for Chennai Super Kings' contest against Delhi Capitals  | IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates

IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या अव्वल दोन संघांमध्ये सामना होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर कोण दावेदारी सांगेल, हे या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण, या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे खेळणे अनिश्चित असल्याचे समजते आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत CSKची दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कसोटी लागणार आहे.



37 वर्षीय धोनीनं मागील काही दिवस सराव सत्रात सहभाग घेतलेला नाही. तो अजूनही पूर्णपणे तंदुरूस्त झाला नसल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली. ''धोनीची प्रकृती सुधारत आहेत. या आठवड्यात तो आजारी होता. त्यामुळे आजच्या लढतीपूर्वी त्याच्या समावेशाबद्दल निर्णय घेण्यात येईल,'' असे फ्लेमिंग यांनी सांगितले.


यंदाच्या सत्रात धोनीला आतापर्यंत दोन सामन्यांना मुकावे लागले होते आणि त्या दोन्ही सामन्यांत चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईच्या नेट रन रेटमध्ये कमालीची घट झाली आहे. अव्वल स्थानावर परतण्यासाठी चेन्नईला आजचा सामना जिंकावा लागेल. चेन्नई आणि दिल्ली यांनी 12 पैकी 8 सामन्यांत विजय मिळवला आहे, परंतु दिल्लीचा ( 0.233) नेट रन रेट हा चेन्नईपेक्षा ( -0.113) चांगला आहे. त्यामुळे दिल्ली अव्वल स्थानावर आहे. 
दरम्यान रवींद्र जडेजाच्या प्रकृतीत सुधारली असून त्याने मंगळवारी कसून सरावही केला. त्यासह फॅफ ड्यू प्लेसिसही आजच्या सामन्यात खेळणार आहे. 




 

Web Title: IPL 2019: Suspense over MS Dhoni's availability for Chennai Super Kings' contest against Delhi Capitals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.