IPL 2019 SRH vs KKR : कोलकाताची पराभवाची 'पंचमी', वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं धु धु धुतले

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरअस्टो यांनी 131 धावांची सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 07:15 PM2019-04-21T19:15:18+5:302019-04-21T19:19:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 SRH vs KKR: Sunrisers Hyderabad won by 9 wicket against Kolkata Knight Riders | IPL 2019 SRH vs KKR : कोलकाताची पराभवाची 'पंचमी', वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं धु धु धुतले

IPL 2019 SRH vs KKR : कोलकाताची पराभवाची 'पंचमी', वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं धु धु धुतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबाद संघाने उत्तम सांघिक कामगिरी करताना रविवारी कोलकाता नाइट रायडर्सवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरअस्टो यांनी 131 धावांची सलामी देत हैदराबादचा विजय पक्का केला होता. या जोडीच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर कोलकाताने विजयासाठी ठेवलेले 160 धावांचे लक्ष्य हैदराबादने सहज पार केले. कोलकाताचा हा सलग पाचवा पराभव ठरला. वॉर्नरने 38 चेंडूंत 67 धावा केल्या, तर बेअरस्टो 43 चेंडूंत 80 धावा करून नाबाद राहिला.


ख्रिस लीन आणि रिंकु सिंग यांच्या संघर्षानंतरही कोलकाता नाइट रायडर्सला रविवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 बाद 159 धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतर सातत्याने पडत राहिलेल्या विकेट्समुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. कोलकाताचा हुकमी एक्का आंद्रे रसेल याला फलंदाजीची फार संधी मिळाली नाही, परंतु त्याने 15 धावा केल्या. रिंकुने 25 चेंडूंत 30 धावा केल्या, तर लीनने 47 चेंडूंत 51 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. 



प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 72 धाव चोपून काढल्या. या जोडीने शतकी भागीदारी करताना आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमधील या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी आहे. या दोघांनी यंदाच्या मोसमात 733 हून अधिक धावांची भागीदारी केली. वॉर्नर आणि बेअरस्टो या दोघांनीही अर्धशतक झळकावले. वॉर्नर आणि बेअरस्टोने 2016च्या आयपीएलमधील शिखर धवन व वॉर्नर या जोडीचा 731 धावांचा विक्रम मोडला. या दोघांनी 12 षटकातच संघाला 130 धावांचा पल्ला गाठून दिला. पराभव डोळ्यासमोर दिसताना कोलकाताच्या क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ कामगिरी केली. त्यांनी दोन सोपे झेल सोडले. परंतु अखेरीस 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी राजने वॉर्नरचा त्रिफळा उडवला. वॉर्नरने 38 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 67 धावा केल्या. वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीनं 131 धावांची सलामी देत हैदराबादचा विजय पक्का केला. 







Web Title: IPL 2019 SRH vs KKR: Sunrisers Hyderabad won by 9 wicket against Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.