IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय | IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय
IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय

हैदराबाद, आयपीएल २०१९ : एकेकाळी अव्वल स्थानावर असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे. आज हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. आजचा सामना जिंकून आठ गुण मिळवण्याचे ध्येय हैदराबादच्या संघाचे असेल, तर दुसरीकडे दहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असेल.

LIVE

Get Latest Updates

11:43 PM

विजयासह दिल्ली दुसऱ्या स्थानावर

 किमो पॉल आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेसनरायझर्स हैदराबादलापराभूत केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादच्या संघाला करता आला नाही. या सामन्यात दिल्लीने हैदराबाद़वर ३९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

दिल्लीच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदकबादाच्या जॉनी बेअस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सलामी दिली. या दोघांनी १० षटकांत ७२ धावांच सलामी दिली. पण संघाच्या ७२ धावा असताना जॉनी बाद झाला. जॉनीने ३१ चेंडूंत ४१ धावा केल्या. जॉनी बाद झाल्यावर वॉर्नरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वॉर्नरने आपले अर्धशतक झळकावले खरे, पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. वॉर्नरला 51 धावा करता आल्या. वॉर्नर बाद झाल्यावर हैदराबादचा डाव कोसळायला सुरुवात झाली.

  

11:38 PM

हैदराबादला नववा धक्का 

11:36 PM

हैदराबादला आठवा धक्का 

11:32 PM

रशिद खान आऊट 

11:30 PM

दीपक हुडा आऊट

दूपक हुडाच्या रुपात हैदराबादला सहावा धक्का बसला. हुडाला यावेळी तीन धावा करता आल्या. 

11:26 PM

विजय शंकर आऊट

कागिसो रबाडाने विजय शंकरला बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. शंकरला फक्त एकच धाव काढता आली.

11:24 PM

डेव्हिड वॉर्नर ५१ धावांवर आऊट

कागिसो रबाडाने वॉर्नरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला ५१ धावा करता आल्या. 

11:22 PM

डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक

वॉर्नरने ४६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

11:17 PM

रिकी भुई आऊट

किमो पॉलने रकी भुईला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. यावेळी भुईला सात धावाच करता आल्या. 

11:11 PM

अमित मिश्राने दिले वॉर्नरला जीवदान

डेव्हिड वॉर्नर ४४ धावांवर असताना मिश्राने आपल्याच गोलंदाजीवर त्याला जीवदान दिले.

11:05 PM

केन विल्यम्सन बाद

विल्यम्सनच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला, त्याला ३ धावाच करता आला. 

10:49 PM

हैदराबादला पहिला धक्का

जॉनी बेअरस्टोवच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला, त्याने ३१ चेडूंत ४१ धावा केल्या. 

10:37 PM

हैदराबादची दमदार सलामी

जॉनी बेअरस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतकी सलामी दिली.

09:43 PM

हैदराबादचा भेदक मारा, दिल्लीच्या १५५ धावा 

09:31 PM

मॉरिसला रशिद खानने केले बाद

रशिद खानने ख्रिस मॉरिसला बाद करत दिल्लीला सहावा धक्का दिला. मॉरिसला चार धावा करता आल्या.

09:26 PM

रीषभ पंत आऊट

खलील अहमदने रिषभ पंतला बाद केले. खलीलचा हा तिसरा बळी होता. पंतने १९ चेंडूंत २३ धावा केल्या. 

09:19 PM

श्रेयस अय्यर आऊट

कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात दिल्लीला मोठा धक्का बसला. श्रेयसने ४० चेंडूंत ४५ धावा केल्या. 

09:15 PM

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांची अर्धशतकी भागीदारी 

08:59 PM

दिल्लीचे शतक पूर्ण

दिल्लीने बाराव्या षटकात आपले शतक पूर्ण केले. रशिद खानच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने चौकार लगावत संघाचे शतक पूर्ण केले. 

08:39 PM

अभिषेक शर्माला पदार्पणातच बळी

या सामन्यात पदार्पण करणाऱ्या अभिषेकने धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या कॉलिन मुर्नोला बद केले. मुर्नोने २४ चेंडूंत ४० धावांची खेळी साकारली. 

08:28 PM

शिखर धवन आऊट

शिखर धवनच्या रुपात दिल्लीचा दुसरा धक्का बसला. खलील अहमदनेच धवनला बाद केले. धवनला सात धावा करता आल्या.

08:25 PM

पृथ्वी शॉ आऊट

पृथ्वी शॉच्या रुपात दिल्लीच्या संघाला पहिला धक्का बसला. पृथ्वीला चार धावाच करता आल्या.

07:36 PM

दिल्लीची प्रथम फलंदाजी

हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हैदराबादने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले.


Web Title: IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.