IPL 2019 RR vs MI: कर्णधार बदलल्यानं राजस्थानचं नशीब पालटलं, मुंबई इंडियन्सवर मात

IPL 2019 RR vs MI: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 07:40 PM2019-04-20T19:40:58+5:302019-04-20T19:41:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 RR vs MI: Rajasthan Royals won by 5 wickets against Mumbai Indians | IPL 2019 RR vs MI: कर्णधार बदलल्यानं राजस्थानचं नशीब पालटलं, मुंबई इंडियन्सवर मात

IPL 2019 RR vs MI: कर्णधार बदलल्यानं राजस्थानचं नशीब पालटलं, मुंबई इंडियन्सवर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. कर्णधारपदाची झालेली खांदेपालट राजस्थानला फळली. कर्णधार म्हणून यंदाच्या हंगामात प्रथमच मैदानावर उतरलेल्या स्टीव्हन स्मिथने अर्धशतकी खेळी करताना राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याला रियान परागने उत्तम साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली आणि राजस्थानने मुंबईवर 5 विकेट राखून मात केली. परागने 29 चेंडूंत 43 धावा केल्या. स्मिथने 48 चेंडूंत नाबाद 59 धावा केल्या.



 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले. डी कॉकने 47 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावा केल्या. यादवने 34 तर हार्दिक पांड्याने 23 धावा केल्या. 



लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे यांनी राजस्थानला आश्वासक सुरुवात करून दिली. चौथ्या षटकात राहुल चहरने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने रहाणेला ( 12) सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. सॅमसन एका बाजूने संघर्ष करत होता. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 60 धावा केल्या. चहरने मुंबईला आणखी एक विकेट मिळवून दिला. त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात सॅमसनने चेंडू उंच उडवला आणि किरॉन पोलार्डने तो टिपला. सॅमसनने 19 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 35 धावा केल्या. चहरने त्याच षटकात बेन स्टोक्सचाही त्रिफळाही उडवला. स्टोक्स भोपळाही न फोडता माघारी परतला.


राजस्थानने 10 षटकांत 3 बाद 90 धावा केल्या. कर्णधार स्मिथ आणि रियान पराग यांनी राजस्थानची गाडी पुन्हा रुळावर आणली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला 15 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. परागला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. तो धावबाद झाला. त्यानंतर आलेला अॅश्टन टर्नरही शून्यावर बाद झाला. 

IPL 2019 : अजिंक्यरहाणेकडूनकर्णधारपदकाढलं, राजस्थानचीधुराऑस्ट्रेलियनशिलेदाराकडेhttps://t.co/7yc4drFgMf@rajasthanroyals@mipaltan@AjinkyaLokmat#stevesmith#RRvMI@IPL

— Lokmat(@MiLOKMAT) April 20, 2019  

IPL 2019 RR vsMI: डी'कॉक-यादवची भागीदारीरायुडू-धोनीवरहीपडलीभारीhttps://t.co/GlTz7ciFga@mipaltan@rajasthanroyals#RRvMI

— Lokmat(@MiLOKMAT) April 20, 2019  

मुंबईइंडियन्सच्याखेळाडूंचाFunny Look कीशिक्षा?https://t.co/Y6qOWXhdSB@mipaltan@IPL#RRvMI

— Lokmat(@MiLOKMAT) April 20, 2019  




 

Web Title: IPL 2019 RR vs MI: Rajasthan Royals won by 5 wickets against Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.