IPL 2019 : अंतिम फेरीत रोहित शर्माला १०० टक्के मार्क्स

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने तीनवेळा जेतेपद पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 07:19 PM2019-05-11T19:19:27+5:302019-05-11T19:20:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Rohit Sharma gets 100% marks in the final | IPL 2019 : अंतिम फेरीत रोहित शर्माला १०० टक्के मार्क्स

IPL 2019 : अंतिम फेरीत रोहित शर्माला १०० टक्के मार्क्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल २०१९ : कर्णधार तोच यशस्वी असतो जो दडपण योग्यपद्धतीने हाताळू शकतो. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने तीनवेळा जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये रोहितला अंतिम फेरीत १०० टक्के मार्क्स द्यावेच लागतील. पण आता चौथ्या आयपीएलचे जेतेपद रोहित मुंबईला मिळवून देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३ साली पहिले जेतेपद पटकावले होते. यावेळी मुंबईचा संघ गुणतालिकेत साखळी फेरीनंतर दुसऱ्या स्थानावर होता. 'क्वॉलिफायर -1' मध्ये मुंबईला चेन्नईकडून ४८ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. पण 'क्वॉलिफायर -२' मध्ये मुंबईने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. अंतिम फेरीत मुंबईने चेन्नईवर २३ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ २०१५ साली दुसऱ्यांदा विजयी ठरला होता. या हंगामातील 'क्वॉलिफायर -1' सामन्यात मुंबईने चेन्नईवर २५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्के केले होते. त्यानंतर इडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम फेरीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावांचा डोंगर उभारला होता. या अंतिम फेरीत मुंबईने चेन्नईवर ४१ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१७ सालीही जेतेपद पटकावले होते. या हंगामातील साखळी फेरीत मुंबईने १४ पैकी १० सामने जिंकले होते. त्यामुळे मुंबईचा संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर होता. पण 'क्वॉलिफायर -1' सामन्यात मुंबईला पुण्याच्या संघाकडून २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पण 'क्वॉलिफायर -२' या सामन्यात मुंबईने कोलकाताला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत मुंबईपुढे चेन्नईचेच आव्हान होते. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात मुंबईने पुण्यावर मात केली आणि तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते.

अंतिम फेरीत चेन्नईपेक्षा मुंबईचेच पारडे जड
यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्यो होणार आहे. एक कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला रोहित शर्मापेक्षा जास्त अनुभव आहे. पण यंदाच्या अंतिम फेरीसाठी मात्र चेन्नईपेक्षा मुंबईचेच पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तर चेन्नईपेक्षा मुंबईच भारी असल्याचे दिसत आहे.

Web Title: IPL 2019: Rohit Sharma gets 100% marks in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.