IPL 2019 : आयपीएलची ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचल्या नीता अंबानी, पाहा हा व्हिडीओ

विजयानंतर नीता यांनी देवाचे आभार मानले आणि आयपीएलची ट्रॉफी मंदिरामध्ये देवाच्या चरणी अर्पण केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 07:15 PM2019-05-14T19:15:15+5:302019-05-14T19:30:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Nita Ambani, who came to the temple with the IPL trophy, watch this video | IPL 2019 : आयपीएलची ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचल्या नीता अंबानी, पाहा हा व्हिडीओ

IPL 2019 : आयपीएलची ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचल्या नीता अंबानी, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल २०१९ : मुंबई इंडियन्सने यंदा जेतेपदाचा चौकार लगावला. अंतिम फेरीच्या अखेरच्या चेंडूवर मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. अंतिम सामन्याच्यावेळी संघाच्या मालकीण नीता अंबानी या देवाचा धावा करत होता. सामन्यावेळी त्या एक मंत्र जपत असल्याचे साऱ्यांनी पाहिले. विजयानंतर नीता यांनी देवाचे आभार मानले आणि आयपीएलची ट्रॉफी मंदिरामध्ये देवाच्या चरणी अर्पण केल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा खास व्हिडीओ


मुंबई इंडियन्सचे मालक आणि रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्यापासून ते ट्रायडंट हॉटेलपर्यंत मुंबईच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली. पुणेरी ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी, विजयी चषकाचे अँटिलियात स्वागत करण्यात आले. संघ मालकिण निता अंबानी यांनी चषक देवाच्या चरणी ठेवला.

मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला. आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईने थरराक लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर 1 धावेने विजय मिळवला. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. त्याच्या नावावर कर्णधार म्हणून चार जेतेपदं जमा झाली आहेत. त्याचे हे एकूण पाचवे जेतेपद आहे. त्यामुळे या विजयाचे सेलिब्रेशनपण दणक्यात व्हायलाच हवे. 

रोहितला आयपीएलच्या अंतिम सामन्यात एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही आणि असा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने डेक्कन चार्जर्सकडून 2009 मध्ये आयपीएलचा चषक उंचावला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून त्यानं ( 2013, 2015, 2017 व 2019 ) चार जेतेपदं जिंकली. जेतेपदांच्या सालावर लक्ष दिल्यास लक्षात येईल की एक वर्षाच्या गॅपनंतर मुंबईने बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाही त्यांचेच नाणं खणखणीत वाजेल यात कुणालाही शंका नव्हती.  

मुंबई इंडियन्से 2017 मध्ये हैदराबाद येथेच अवघ्या 1 धावेने हार मानण्यास भाग पाडले होते आणि 2019 मध्ये त्यांनी चेन्नईवरही एका धावेने विजय मिळवला. यापूर्वी  मुंबईने जिंकलेल्या तीनही जेतेपदाच्यावेळी ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू हा ऑस्ट्रेलियाचाच राहिला आहे. पण, 2013 आणि 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण जुळले आहे. त्यामुळे याच निकषावर मुंबईने यंदाही जेतेपदाचा चषक उंचावला. वॉर्नर यंदाही मुंबई इंडियन्ससाठी 'लकी बॉय' ठरला. 

Web Title: IPL 2019: Nita Ambani, who came to the temple with the IPL trophy, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.