IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय

LIVE

हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 06:31 PM2019-03-29T18:31:49+5:302019-03-29T23:55:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय | IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय

IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला. विजयाच्या उंबराठ्यावर असताना सनरायझर्स हैदराबादला तीन धक्के बसले, मात्र, सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर मात करण्यात यश मिळवले. सनरायझर्स हैदराबादने 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावा केल्या. दरम्यान, अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 198 धावा चोपल्या होत्या. रहाणे व सॅमस या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. रहाणे 70 धावांवर माघारी परतला, तर सॅमसनने नाबाद 102 धावा चोपताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. 

LIVE

Get Latest Updates

11:59 PM



 

11:41 PM

सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय



 

11:37 PM

सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 4 धावांची गरज. 

11:27 PM



 

11:20 PM

हैदराबादला पाचवा धक्का, पांडे अवघ्या एका धावेवर बाद



 

11:18 PM

विजय शंकर 35 धावांवर बाद झाला. त्याने 15 चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार लगावत 35 धावा केल्या.



 

11:15 PM



 

11:06 PM

14 षटकांत दोन बाद 153 धावा

सनरायझर्स हैदराबादच्या  14 षटकांत दोन बाद 153 धावा झाल्या आहेत. विजय शंकरची शानदार फटेबाजी.

11:06 PM

विलिम्सन 14 धावांवर झेलबाद झाला. सनरायझर्स हैदराबाद धावसंख्या - 165/3 



 

11:01 PM



 

10:47 PM

जॉ़नी बेअरस्टोला जीवदान देणाऱ्या धवल कुलकर्णीनं 12व्या षटकात अफलातून झेल टिपला. बेअरस्टोसह हैदराबादच्या चाहत्यांनाही या झेलवर विश्वास बसला नाही. बेअरस्टोने 28 चेंडूंत 1 षटकार व 6 चौकार लगावत 48 धावा केल्या. 

10:43 PM

 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉर्नर बाद झाला. बेन स्टोक्सने 37 चेंडूंत 69 धावा करणाऱ्या वॉर्नरला बाद केले. वॉर्नरने 9 चौकार व 2 षटकार खेचले. 
 

10:43 PM



 

10:36 PM

सनरायझर्स हैदराबाद संघाने 8.5 षटकांत शतकी पल्ला पार केला. जॉनी बेअरस्टोनं खणखणीत षटकार खेचून संघाला शंभरी पार करून दिली. 

10:34 PM



 

10:25 PM

पॉवर प्लेमध्ये हैदराबाद संघाने एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 27 चेंडूंत 52 धावा, तर जॉनी बेअरस्टोने 9 चेंडूंत 16 धावा केल्या. 

10:23 PM



 

10:22 PM

डेव्हिड वॉर्नरने 26 चेंडूंत 51 धावांची खेळी केली. त्यात 8 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. आयपीएलमधील त्याचे हे 38वे अर्धशतक ठरले. 

10:20 PM

बेन स्टोक्सच्या पहिल्याच षटकार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी 17 धावा चोपल्या. हैदराबादने 5 षटकांत 54 धावा केल्या. 

10:01 PM

सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रहार केला. धवल कुलकर्णीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून त्यानं आपला इरादा स्पष्ट केला. त्यानंतर त्याने एक खणखणीत षटकारही खेचला आणि हैदराबादने पहिल्या षटकात 14 धावा केल्या.

09:31 PM

सॅमसनने भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या 18 व्या षटकात 24 ( 4 चौकार व 1 षटकार व दोन धावा) धावा चोपल्या. 
 

09:24 PM

संजू सॅमसनचा झेल सोडला. सिद्धार्थ कौलच्या 17व्या षटकात हैदराबादचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने सॅमसनला 60 धावांवर जीवदान दिले.

09:19 PM

अजिंक्य रहाणेची खेळी 15.5 षटकात संपुष्टात आली. शाहबाद नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारणाऱ्या रहाणेचा झेल पांडेने टिपला. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. 

09:13 PM

राजस्थान रॉयल्सने 15 षटकातं 1 बाद 122 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 63 आणि संजू सॅमसन 51 धावांवर खेळत आहेत

09:09 PM



 

09:08 PM

अजिंक्य रहाणे व संजू सॅम्सन यांनी शतकी भागीदारी करताना राजस्थान रॉयल्सला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करून दिली, रहाणेपाठोपाठ सॅम्सन यानेही अर्धशतक पूर्ण केले,.

09:01 PM



 

09:00 PM

राजस्थान रॉयल्सने 11.5 षटकांत शतकी आकडा पार केला. अजिंक्य रहाणे आणि संजू सॅम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी दमदार फलंदाजी केली. 

08:49 PM

अजिंक्य रहाणे आणि संजू सॅम्सन या जोडीनं राजस्थान रॉयल्सच्या डावाला आकार दिला. राजस्थानने 10 षटकांत 75 धावा केल्या, रहाणे 35, तर सॅम्सन 33 धावांवर खेळत आहे. 

08:46 PM

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन या जोडीनं आयपीएलमध्ये 750 धावांचा पल्ला पार केला. 



 

08:32 PM

पॉवर प्लेमध्ये राजस्थान रॉयल्सला केवळ 36 धावा करता आल्या.

08:27 PM



 

08:26 PM

राजस्थान रॉयल्सने पाच षटकांत एक विकेट गमावून 31 धावा केल्या. रशद खान याने त्याच्या पहिल्याच षटकात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला बाद केले. रशीदने चौथ्यांदा बटलरची विकेट घेतली आहे. विशेष म्हणजे बटलरने रशीदच्या केवळ दहा चेंडूंचा सामना केला आहे आणि त्याला 10 धावा करता आल्या.

08:19 PM



 

08:18 PM

राजस्थानला 15 धावांवर पहिला धक्का

सनरायझर्स हैदराबादने चौथ्याच षटकात हुकुमी अस्त्र बाहेर काढले, त्यांनी चेंडू फिरकीपटू रशीद खानच्या हाती दिला आणि रशीदने दुसऱ्याच चेंडूवर राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचा त्रिफळा उडवला. 

07:45 PM

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे, जोस बटलर, स्टीव्हन स्मिथ, संजू सॅम्सन, बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी, के गोवथम, एस गोपाळ, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी

07:43 PM

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, मनीष पांडे, युसूफ पठाण, नदीम, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा

07:40 PM



 

07:36 PM

राजस्थान संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हैदराबाद संघात दोन बदल झाले आहेत. शकीब अल हसन आणि दीपक हूडा यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्याजागी संघात केन विलियम्सन व नदीम यांना संधी मिळाली आहे. 

07:32 PM

हैदराबादच्या संघात आनंदाचे वातावरण

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुखातपीतून सावरला असून तो आजच्या सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नेतृत्वाच जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. 

07:02 PM

हैदराबादचा संघ स्टेडियममध्ये दाखल



 

06:51 PM

घरच्या मैदानावर हैदराबादचे पारडे जड

2017च्या हंगामानंतर हैदराबाद संघाची घरच्या मैदानावरील जय-पराजयाची आकडेवारी 11-3 अशी आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला येथे विजय मिळवणे तितके सोपे नक्की नसेल.



 

 

06:42 PM

राजस्थानच्या जोस बटलरला आहे हैदराबादच्या रशीद खानची धास्ती



 

06:39 PM

हैदराबादच्या घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यासाठी चाहते उत्सुक



 

06:36 PM

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पहिल्या विजयाच्या शोधात.. हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता, तर किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थानवर 14 धावांनी विजय मिळवला होता. 

Web Title: IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.