IPL 2019 KXIP vs CSK : पंजाबचा विजयी निरोप, चेन्नईवर 6 विकेट राखून मात

मोहाली, आयपीएल 2019 : लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीनेच किंग्स इलेव्हन पंजाबचा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 03:17 PM2019-05-05T15:17:02+5:302019-05-05T19:40:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 KXIP vs CSK live update, Kings XI Punjab VS Chennai Super Kings Match Score, Highlight, news in Marathi  | IPL 2019 KXIP vs CSK : पंजाबचा विजयी निरोप, चेन्नईवर 6 विकेट राखून मात

IPL 2019 KXIP vs CSK : पंजाबचा विजयी निरोप, चेन्नईवर 6 विकेट राखून मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल 2019 : लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीनेच किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली. निकोलस पुरणचा झेल सोडणे चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले आणि पंजाबने विजयासह आयपीएलचा निरोप घेतला. चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. पण, त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे. 

07:07 PM

 ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मुरली विजयने निकोलस पुरनचा सोपा झेल सोडला. 
 

07:02 PM

भज्जीनं पुढच्याच षटकात पंजाबला आणखी एक धक्का देत मयांक अग्रवालला माघारी पाठवले. 

06:54 PM

 गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली.  या दोघांची 108 धावांची भागीदारी हरभजन सिंगने संपुष्टात आणली. भज्जीनं 11व्या षटकात राहुल व गेल यांना लागोपाठ माघारी पाठवले. भज्जीची हॅटट्रिक मात्र हुकली. राहुल 36 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 71 धावा करत माघारी परतला. गेलने 28 चेंडूंत 28 धावा केल्या. 
 

06:31 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण, चौकार षटकारांच्या आतषबाजीत गेलपेक्षा राहुल अधिक आक्रमक खेळ केला. लोकेशने 19 चेंडूंत अर्धशतक केले. आयपीएलमधील हे तिसरे जलद अर्धशतक ठरले. गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 

05:55 PM

फॅफ ड्यू प्लेसिसची 96 धावांची खेळी पाहा एका क्लिकवर...



 

05:52 PM

 

05:51 PM



 

05:37 PM

सॅम कुरनने केले फॅफला निरुत्तर

05:24 PM

कुरनने ही जोडी तोडली. रैना 38 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या.

05:19 PM

फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला

05:07 PM

पाठोपाठ रैनाने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.



 

05:00 PM

फॅफचे अर्धशतक



 

05:00 PM

ड्यू प्लेसिस आणि रैना या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ड्यू प्लेसिसने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ड्यू प्लेसिस आणि रैना यांनी 67 धावांच्या भागीदारीचा पल्ला ओलांडताच एक विक्रम नावावर केला. पंजाबविरुद्ध यंदाच्या मोसमात चेन्नईकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

04:48 PM

ड्यू प्लेसिस आणि रैना या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 


04:43 PM



 

04:42 PM

असा उडाला शेन वॉटसनचा त्रिफळा, पाहा व्हिडीओ

https://www.iplt20.com/video/186919

04:39 PM

चेन्नईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही पॉवर प्लेमधील पाचवी सर्वोत्तम कामगिरी आहे. सॅम कुरनने पाचव्या षटकात वॉटसनला ( 7) त्रिफळाचीत केले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचा डाव सावरला. चेन्नईने 9 षटकांत 1 बाद 67 धावा केल्या. 
 

04:14 PM

नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत प्ले ऑफचे स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले. पंजाबला प्ले ऑफच्या आशा जीवंत राखण्यासाठी या सामन्यात 251+ धावांच्या फरकाने किंवा चेन्नईला 100च्या आत गुंडाळावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना कोलकाताच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. पण, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन त्यांनी प्ले ऑफचा मार्ग स्वतः बंद केला आहे. 

04:05 PM

पंजाबचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय चुकला, जाणून घ्या का

IPL 2019 : चेन्नईला'Top Two'मध्ये राहण्यासाठीकरावीलागेलहीगोष्टhttps://t.co/ngNqBe4O6S@ChennaiIPL@lionsdenkxip#KXIPvCSK@IPL

— Lokmat(@MiLOKMAT) May 5, 2019  

03:36 PM

चेन्नईच्या संघात कोणताच बदल नाही, पंजाबच्या संघात हरप्रीत ब्रार IN व अर्षदीप सिंग OUT

03:33 PM

नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूनं



 

03:32 PM



 

03:28 PM



 

03:27 PM



 

Web Title: IPL 2019 KXIP vs CSK live update, Kings XI Punjab VS Chennai Super Kings Match Score, Highlight, news in Marathi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.