IPL 2019 KKR vs RCB : कोहली-अली जोडी जमली, चौकार-षटकारांची आतषबाजी झाली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 4 बाद 213 धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 09:41 PM2019-04-19T21:41:19+5:302019-04-19T21:46:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: KKR vs RCB:Virat kohli 100 runs, RCB set 214 runs target to KKR | IPL 2019 KKR vs RCB : कोहली-अली जोडी जमली, चौकार-षटकारांची आतषबाजी झाली

IPL 2019 KKR vs RCB : कोहली-अली जोडी जमली, चौकार-षटकारांची आतषबाजी झाली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2019 KKR vs RCB : मोइन अली आणि विराट कोहली यांच्या जोरदार आतषबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 4 बाद 213 धावा चोपल्या. अली व कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करताना तिसऱ्या विकेटसाठी झटपट 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. कोहलीनेही 58 चेंडूंत 100 धावा केल्या. त्यात 9चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. 



 



सावध सुरुवातीनंतर बंगळुरूला पहिला धक्का बसला. सलामीवीर पार्थिव पटेल 11 धावांवर बाद झाला. सुनील नरीनने त्याला नितीश राणाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. नरीनच्या आधीच्या षटकात विराट कोहली विरोधात पायचीतची अपील करण्यात आली होती. त्यासाठी कोलकाताने DRSही घेतला, परंतु सुदैवाने कोहली बचावला. 


अक्षदीप नाथला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत कोहलीनं पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. नाथ आणि कोहली ही जोडी बंगळुरूला सावरेल असे वाटले होते, परंतु 9 व्या षटकात आंद्रे रसेलने त्यांना धक्का दिला. रसेलने 13 धावा करणाऱ्या नाथला बाद केले. यासह त्याने कोलकाता नाइट रायडर्सकडून 50 विकेट घेण्याचा विक्रम नावावर केला. बंगळुरूने 10 षटकांत 2 बाद 70 धावांपर्यंत मजल मारली होती. 


मोइन अलीने खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्यासाठी फार वेळ न घेता फटकेबाजी सुरू केली. या फटकेबाजीमुळे कोहली व अली यांनी 21 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. कोहलीने 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. कोहलीचे हे आयपीएलमधील 37वे अर्धशतक ठरले. त्याने यासह गौतम गंभीर व सुरेश रैना यांच्या प्रत्येकी 36 अर्धशतकांचा विक्रम मोडला. पुढच्याच षटकात अलीनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने 24 चेंडूंत ही अर्धशतकी खेळी केली. त्याने कुलदीप यादवने टाकलेल्या 16व्या षटकात 27 धावा चोपल्या, परंतु त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. प्रसिधने त्याचा झेल टिपला. मोइन अलीनं आयपीएलमध्ये पाचवे जलद अर्धशतक झळकावले. या विक्रमात रिषभ पंत ( 17) आघाडीवर आहे. कुलदीपने चार षटकांत 59 धावा दिल्या. आयपीएलमध्ये फिरकीपटूने दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. इम्रान ताहीरने 2016मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 59 धावा दिल्या होत्या. अली आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. 


अली माघारी फिरल्यानंतर कोहलीच्या आतषबाजीनं इडन गार्डन गाजवले. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 213 धावा केल्या. बंगळुरूने 14 ते 19 या षटकांत एक विकेट गमावत 100 धावा चोपल्या. कोहलीने 57 चेंडूंत शतक पूर्ण केले. 
 

 

Web Title: IPL 2019: KKR vs RCB:Virat kohli 100 runs, RCB set 214 runs target to KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.