IPL 2019 : आयपीएलची 'रन'धुमाळी; आता निवडणूकांमुळे होणार परदेशवारी...

आज झालेल्या बैठकीनंतर मात्र आयपीएल भारतामध्ये खेळवणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:31 PM2019-01-03T17:31:52+5:302019-01-03T17:35:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: ipl 2019 might be hosted outside India | IPL 2019 : आयपीएलची 'रन'धुमाळी; आता निवडणूकांमुळे होणार परदेशवारी...

IPL 2019 : आयपीएलची 'रन'धुमाळी; आता निवडणूकांमुळे होणार परदेशवारी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देबीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक बदलले तर ती भारतात खेळवली जाऊ शकते.बीसीसीआयला गृह आणि परराष्ट्र या दोन्ही मंत्रालयांशी संवाद साधावा लागेल.पण यंदाचे आयपीएल भारतात होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली, आयपीएल : सध्याच्या घडीला देशामध्ये लोकसभा निवडणूकीचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणूकीमध्ये नेमके काय होणार यावर चर्वितचर्वण सुरु आहे. भारतात ज्या काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्याचवेळी बीसीसीआयचीआयपीएल ही स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्यावेळी ही स्पर्धा भारतामध्ये खेळवायची की नाही याविषयावर आज बीसीसीआय आणि क्रीडा मंत्रालयामध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये निवडणूकीच्यावेळी आयपीएल भारतामध्ये खेळवणे कठीण असल्याचे म्हटले गेल्याची चर्चा झाली.

काही दिवसांपूर्वी 2019 साली होणारी आयपीएल भारतामध्ये होणार नाही, अशी चर्चा सुरु होती. त्यावेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयपीएल भारतामध्येच खेळवण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. पण आज झालेल्या बैठकीनंतर मात्र आयपीएल भारतामध्ये खेळवणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे.

क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी याबाबत सांगितले की, " आज बीसीसीआयची एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये क्रीडा मंत्रालयाने काही गोष्टी बीसीसीआयला सांगितल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला स्पष्ट केले की, निवडणूकीच्या काळामध्येच आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे जर आयपीएल भारतामध्येच खेळवायचे असेल तर बीसीसीआयला गृह आणि परराष्ट्र या दोन्ही मंत्रालयांशी संवाद साधावा लागेल. " 

या बैठकीनंतर आयपीएलचे चेअरमन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्येही आयपीएल देशाबाहेर होण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, " लोकसभा निवडणूका आणि आयपीएल एकाच काळात होणार आहेत. त्यामुळे यंदाचे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. "

बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक बदलले तर ती भारतात खेळवली जाऊ शकते. पण बीसीसीआयचे वेळापत्रक एवढे व्यस्त आहे की, त्यांना आयपीएलमध्ये बदल करता येणार नाहीत. जर त्यांनी आयपीएल थोडी उशिरा सुरु केली तर त्यांना विश्वचषकासाठी समस्या होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएल भारताबाहेर खेळवण्याशिवाय बीसीसीआयकडे दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: IPL 2019: ipl 2019 might be hosted outside India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.