पायातून रक्तस्त्राव होत असतानाही CSK ला विजय मिळवून देण्यासाठी त्याने अखेरपर्यंत दिली झुंज

IPL 2019 Final : चेन्नई सुपर किंग्स हा केवळ संघ नाही तर एक कुटुंब आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 09:55 AM2019-05-14T09:55:57+5:302019-05-14T10:03:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 Final : Shane Watson batted through bloodied leg in IPL 2019 final, say Harbhajan Singh | पायातून रक्तस्त्राव होत असतानाही CSK ला विजय मिळवून देण्यासाठी त्याने अखेरपर्यंत दिली झुंज

पायातून रक्तस्त्राव होत असतानाही CSK ला विजय मिळवून देण्यासाठी त्याने अखेरपर्यंत दिली झुंज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल : चेन्नई सुपर किंग्स हा केवळ संघ नाही तर एक कुटुंब आहे. त्यामुळेच या संघातील एकजुट कोणी मोडू शकत नाही. तरुणांसाठीच्या आयपीएलमध्ये CSKचा संघ हा तीशीपल्ल्याड खेळाडूंचा म्हणून ओळखला जातो. पण, वयासोबत येणारी प्रगल्भता आणि गाठीशी असलेला अनुभव या संघाला सर्वात वेगळा ठरवतो. त्यामुळेच आपल्या कुटुंबाला विजय मिळवून देण्यासाठी प्रत्येक खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करतो. याची प्रचिती अनेकदा आली आहे, परंतु आता समोर आलेल्या प्रसंगावरून CSKला का सर्वोत्तम म्हटले जाते, हे कळेल.


यंदाच्या आयपीएलचे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. मुंबईने विजयासाठी ठेवलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला एक धाव कमी पडली. मुंबईने त्यांना 7 बाद 148 धावांवर रोखले. मुंबईने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. 



 


चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारा वॉटसन हा दुखापरग्रस्त होता. त्याच्या डाव्यापायाच्या मांडीतून रक्तस्त्राव होत होते. पण तरीही तो संघासाठी खेळपट्टीवर उभा राहिला. चेन्नईचा फिरकीपटू हरभजन सिंगने ही गोष्ट अभिमानाने सर्वांना सांगितली. सामन्यानंतर वॉटसनच्या जखमेवर सहा टाके बसले. वॉटसनच्या या लढाऊ बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.















 

आम्ही एकमेकांकडे ट्रॉफी सोपवित आहोत - महेंद्रसिंग धोनी
 अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध एका धावेने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला,‘हा मजेदार खेळ असून, यात दोन संघ एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत असल्याचे दिसून येते.’ सुरुवातीला सामन्यात चेन्नईचे वर्चस्व होते. पण मधल्या षटकांमध्ये मुंबईने पुनरागमन केले. असे वाटत होते की, शेन वॉटसन पुन्हा एकदा चेन्नईला जेतेपद पटकावून देईल. पण जसप्रती बुमराह व लसिथ मलिंगाने शानदार गोलंदाजी करीत पारडे फिरवले. धोनी म्हणाला,‘आम्ही एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत आहो, हे रंगतदार आहे. दोन्ही संघांनी चुका केल्या, पण विजेत्या संघाने एक चूक कमी केली.’

Web Title: IPL 2019 Final : Shane Watson batted through bloodied leg in IPL 2019 final, say Harbhajan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.