IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट

अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:11 AM2019-05-13T10:11:21+5:302019-05-13T10:12:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 Final: According to Tendulkar, the turning point in the last match was decided | IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट

IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद - अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला. निर्धारीत 20 षटकांमध्ये केवळ 149 धावाच जमवल्यानंतर 150 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत विजयश्री खेचून आणली. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा मेन्टॉर सचिन तेंडुलकर याने महेंद्र सिंह धोनीचे धावबाद होणे हे मुंबईच्या विजयात टर्निंग पॉइंट ठरल्याचे म्हटले आहे. 

मुंबईने विळवलेल्या रोमहर्षक विजयानंतर सचिन म्हणाला की, ''सामन्याच्या मध्यावर महेंद्रसिंग धोनीचे धावबाद होणे मुंबईच्या विजयात टर्निंग पॉईंट ठरले. तसेच जसप्रीत बुमराने केलेली गोलंदाजीसुद्धा महत्त्वपूर्ण ठरली. सुरुवातीच्या षटकांमध्ये लसिथ मलिंगा महागडा ठरला. मात्र बुमराने उणीव भरून काढली.'' यावेळी फिरकीपटू राहुल चहर आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचेही सचिनने कौतुक केले. 

रविवारी झालेल्या अंतिम लढतीत  मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. अखेरीस कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. 





मुंबईने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्नईची चांगली सुरुवात झाली. पण कालांतराने त्यांनी ठराविक फरकाने फलंदाज गमावले. मात्र वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना वॉटसनने अर्धशतक झळकावले. अखेरीस शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 9 धावांची गरज असताना एक बाजू लावून धरणारा शेन वॉटसन धावबाद झाला. तर मलिंगाने अखेरच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला पायचीत करत मुंबईला एका धावेने थरारक विजय मिळवून दिला. 
  

Web Title: IPL 2019 Final: According to Tendulkar, the turning point in the last match was decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.