IPL 2019 : कोलकात्याला कार्तिक पावला, रॉयल्सपुढे 176 धावांचे आव्हान

कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याला राजस्थानपुढे आव्हानात्मक धावसंख्या ठेवता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 09:36 PM2019-04-25T21:36:41+5:302019-04-25T21:51:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Dinesh Karthik Batted fantastic, Kolkata Knight Riders given 176 runs target to Rajasthan Royals | IPL 2019 : कोलकात्याला कार्तिक पावला, रॉयल्सपुढे 176 धावांचे आव्हान

IPL 2019 : कोलकात्याला कार्तिक पावला, रॉयल्सपुढे 176 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल २०१९ : कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याला राजस्थानपुढे आव्हानात्मक धावसंख्या ठेवता आली. कार्तिकने ५० चेंडूंत नाबाद 97 धावांची खेळी साकारली.



 

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम कोलकात्याला फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकात्याच्या फलंदाजांना यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही, या गोष्टीला अपवाद ठरला तो कार्तिक. कारण कार्तिकने संघाला फक्त अडचणीतून बाहेर काढले नाही, तर संघाला आव्हानात्मक धावसंख्याही उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.



 

राजस्थानकडून संघात पुनरागमन करणाऱ्या वरुण आरोनने यावेळी भेदक मारा केला. आरोनने आपल्या चार षटकांमध्ये २० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले.

Web Title: IPL 2019: Dinesh Karthik Batted fantastic, Kolkata Knight Riders given 176 runs target to Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.