IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय

दिल्लीने विजयासह 12 गुणांची कमाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:39 PM2019-04-20T23:39:22+5:302019-04-20T23:52:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Delhi won over Punjab in the last over | IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय

IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली आयपीएल : शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेकिंग्ज इलेव्हन पंजाबवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

पंजाबने दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग दिल्लीच्या संघाने केला. या सामन्यात दिल्लीने पंजाबवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने 12 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.

 



 

 पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या तुफानी फटकेबाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. पण गेल बाद झाल्यावर पंजाबच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. गेल खेळत असताना पंजाब दोनशे धावा करेल, असे वाटत होते, पण त्यांना 163 धावांवर समाधान मानावे लागले.

दिल्लीने नाणेफे जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. लोकेश राहुलने आक्रमक फलंदाजी केली, पण त्याला 12 धावावंरच समाधान मानावे लागले. त्यानंतर गेलचे वादळ पाहायला मिळाले. गेलने सहा चौकार आणि पाच षटकाराच्या जोरावर 37 चेंडूंत 69 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

गेलचा अप्रतिम झेल यावेळी सीमारेषेवर लिन इनग्राम आणि अक्षर पटेल यांनी पकडला. हा झेल अप्रतिम असाच होता. गेलला यावर विश्वास बसला नाही. पण गेलला तिसऱ्या पंचांनी बाद दिले. गेल बाद झाल्यावर मात्र पंजाबच्या संघाला जलदगतीने धावा जमवण्यात अपयश आले.

... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेलच, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाही
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने धडाकेबाज फलंदाजी केली. पण ख्रिस गेलचा झेल जो यावेळी पकडला तो तुम्ही कधीही पाहिला नसेल. गेलला तर हा झेल पकडलाय यावर विश्वाच बसला नाही.

बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलने षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही गेलने मोठा फटका मारला. पण हा चेंडू सीमारेषेजवळ असलेल्या कॉलिन इन्ग्रामने पकडला. पण चेंडू पकडल्यावर त्याला तोल जात होता. आपला तोल जातोय हे कॉलिनला समजले. त्यावेळी त्याने आपल्या जवळ कोणी क्षेत्ररक्षण आहे का, हे पाहिले. त्यावेळी अक्षर पटेल कॉलिनच्या जवळ होता. त्यावेळी कॉलिनने हा चेंडूं थेट अक्षरच्या हातामध्ये फेकला आणि गेल बाद झाला.

गेल आऊट आहे कि नाही, हे मैदानावरील पंचांनाही ठरवता येत नव्हते. त्यावेळी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहिली आणि अखेर गेल बाद असल्याचा निर्णय दिला.

Web Title: IPL 2019: Delhi won over Punjab in the last over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.