IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

दिल्लीचा हैदराबादवर ३९ धावांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:36 PM2019-04-14T23:36:03+5:302019-04-14T23:41:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Delhi CAPITAL's win on Sunrisers Hyderabad | IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०१९ : किमो पॉल आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेसनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादच्या संघाला करता आला नाही. या सामन्यात दिल्लीने हैदराबाद़वर ३९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

दिल्लीच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदकबादाच्या जॉनी बेअस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सलामी दिली. या दोघांनी १० षटकांत ७२ धावांच सलामी दिली. पण संघाच्या ७२ धावा असताना जॉनी बाद झाला. जॉनीने ३१ चेंडूंत ४१ धावा केल्या. जॉनी बाद झाल्यावर वॉर्नरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वॉर्नरने आपले अर्धशतक झळकावले खरे, पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. वॉर्नरला 51 धावा करता आल्या. वॉर्नर बाद झाल्यावर हैदराबादचा डाव कोसळायला सुरुवात झाली.

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदने भेदक मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावांना वेसण घातली. भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्सच्या हैदराबादने दिल्लीच्या संघाला 155 धावांवर रोखले.


हैदराबादने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादच्या संघात पुनरागमन करणाऱ्या खलील अहमदने सुरुवातीला भेदक मारा केला. खलीलने पृथ्वी शॉ आणि त्यानंतर शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले असले तरी या सामन्यात प्रथमच यंदाच्या हंगामात खेळणाऱ्या कॉलिन मुर्नोने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुर्नोने २४ चेंडूंत ४० धावांची दमदार खेळी साकारली. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या हैदराबादच्या अभिषेक शर्माने बाद केले.

मुर्नो बाद झाल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी संयतपणे फलंदाजी केली. पण भुवनेश्वर कुमारने श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयसला ४० चेंडूंत ४५ धावा करता आल्या. श्रेयस पाठोपाठ पंतही बाद झाला. खलीलने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. पंतने १९ चेंडूंत २३ धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ
आयपीएलच्या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता असते. आयपीएलचे चाहते सर्व वयोगटांमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भेटायला एक आज्जीबाई आल्या होत्या. आता तर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भेटायला एक नन्ही परी आल्याचे पाहायला मिळाले.

सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नर सराव करत होता. त्यावेळी एका नन्ही परीने त्याला आवाज दिला. वॉर्नरचे पायही तिच्याकडे वळले. ती नन्ही परी होती वॉर्नरची मुलगी. वॉर्नर तिच्याकडे वळल्यावर तिने आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ



 

Web Title: IPL 2019: Delhi CAPITAL's win on Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.