IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

घरच्या मैदानावर चेन्नईचा संघ 46 धावांनी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:48 PM2019-04-26T23:48:35+5:302019-04-26T23:50:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs MI Mumbai Indians beat Chennai Super Kings by 46 runs | IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्सला शुक्रवारी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या 155 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 109 धावाच करता आल्या. या विजयासह मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. 

रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 4 बाद 155 धावा केल्या. चेन्नईसमोर विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य आहे. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 67 धावा केल्या. लुईसने 30 चेंडूंत 32 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना मुंबईच्या धावांवर वेसण घातली. 

IPL 2019 CSK vsMI : रोहित-लुईसचीखेळी; मुंबईइंडियन्सच्यासमाधानकारकधावाhttps://t.co/c2cPZpukGV@mipaltan@ChennaiIPL@IPL#CSKvMI

— Lokmat(@MiLOKMAT) April 26, 2019  

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. मागील सामन्यातील शतकवीर शेन वॉटसन षटकाच्या पाचव्या चेंडूवर लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर राहुल चहरच्या हातात झेल देऊन माघारी परतला. मलिंगाच्या दुसऱ्या षटकात मुरली विजयला जीवदान मिळाला. अनुकूल रॉयने झेल सोडला. पण, हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात सुरेश रैनाला बाद करून ती कसर भरून काढली. रैना 2 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ अंबाती रायुडूही त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. कृणाल पांड्याच्या सुरेख चेंडूंनं रायुडूच्या यष्टीचा वेध घेतला. पॉवर प्लेमध्ये चेन्नईने 3 फलंदाज गमावून 40 धावा केल्या होत्या. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयचा झेल हवेत उडाला होता आणि तो टिपण्यासाठी कृणाल पांड्याने प्रयत्नही केले, परंतु त्याला यश मिळाले नाही. कृणालने मुंबईला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने केदार जाधवला त्रिफळाचीत केले. केदारला 6 धावा करता आल्या. 

विजय एका बाजूने संयमी खेळ करत विकेट टिकवून होता. पण, मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या अनुकूल रॉयने चेन्नईला धक्का दिला. त्याने ध्रुव शौरेयला बाद केले. चेन्नईचे पाच फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते. त्यानंतरही चेन्नईचे धक्का सत्र कायम राहिले. खेळपट्टीवर चिकटलेला विजय माघारी परतला. या धक्क्यातून चेन्नई सावरू शकला नाही. 


Web Title: IPL 2019 CSK vs MI Mumbai Indians beat Chennai Super Kings by 46 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.