IPL 2018: 'हा' वीर आहे प्ले-ऑफचा 'बॉस', चेन्नईसाठी ठरणार खास 

आयपीएलच्या ११ पर्वांचा विचार केल्यास, धोनीसेनेची - अर्थात चेन्नईची कामगिरी सगळ्यात सातत्यपूर्ण राहिलीय असं म्हणता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 01:17 PM2018-05-22T13:17:36+5:302018-05-22T13:17:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: suresh raina played exceptionally well in play offs for CSK | IPL 2018: 'हा' वीर आहे प्ले-ऑफचा 'बॉस', चेन्नईसाठी ठरणार खास 

IPL 2018: 'हा' वीर आहे प्ले-ऑफचा 'बॉस', चेन्नईसाठी ठरणार खास 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईः आयपीएल-२०१८ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज 'कॅप्टन कूल' विरुद्ध 'कॅप्टन केन' आमनेसामने उभे ठाकणार आहेत. चेन्नई आणि हैदराबाद या तुल्यबळ संघांमध्ये होणाऱ्या लढाईत कोण बाजी मारणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यासाठी बरीच आकडेमोडही सुरू आहे. त्यातूनच एका शिलेदाराचं नाव पुढे आलंय, जो प्ले-ऑफचा 'बॉस' आहे. त्याचं नाव आहे, सुरेश रैना. आत्तापर्यंतच्या प्ले-ऑफमधील रैनाचा धडाका पाहता, तो आजच्या सामन्यात काय किमया करतो, याकडे चेन्नईच्या चाहत्यांचं लक्ष आहे.

आयपीएलच्या ११ पर्वांचा विचार केल्यास, मुंबई इंडियन्स हा सगळ्यात यशस्वी संघ ठरला असला, तरी धोनीसेनेची - अर्थात चेन्नईची कामगिरी सगळ्यात सातत्यपूर्ण राहिलीय असं म्हणता येईल. सुरेश रैना या संघाचा प्रमुख शिलेदार राहिलाय आणि बऱ्याच विजयांमध्ये त्यानं मोलाची भूमिकाही बजावली आहे. चेन्नईकडून तो प्ले-ऑफचे १३ सामने खेळलाय. त्यात पाच अर्धशतकांसह त्यानं ४२७ धावा फटकावल्यात. त्याच्या याच दमदार कामगिरीवर एक नजर टाकूया... 

२००८ : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धची दुसरी सेमी फायनलः सुरेश रैनानं ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ चेंडूत तडकावल्या ५५ धावा

२०११ : चेन्नई वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पहिला क्वालिफायर सामनाः ४ चौकार आणि ६ षटकार ठोकत रैनानं पाडला ७३ धावांचा पाऊस

२०१३ : चेन्नई वि. मुंबई इंडियन्स पहिला क्वालिफायर सामनाः रैनानं ४२ चेंडूत कुटल्या ८२ धावा. माइक हसीसोबत (८६ धावा) रचली १६८ धावांची भागीदारी

२०१४ : चेन्नई वि. मुंबई एलिमिनेटर सामनाः ३३ चेंडूत ५४ धावा फटकावून सुरेश रैनानं विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. 

२०१४ : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध क्वालिफायर - २ सामना: वीरेंद्र सेहवागच्या शतकाच्या जोरावर पंजाबनं २२६ धावांचा डोंगर रचला होता. तो सर करण्यात चेन्नई अपयशी ठरली, पण रैनाच्या खेळीनं सगळ्यांची मनं जिंकली होती. १२ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने त्यानं अवघ्या २५ चेंडूत ८७ धावा तडकावल्या होत्या. 
  

Web Title: IPL 2018: suresh raina played exceptionally well in play offs for CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.