आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार

रविचंद्रन अश्विनने पंजाब संघाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:08 PM2018-02-06T19:08:25+5:302018-02-06T19:08:48+5:30

whatsapp join usJoin us
ipl-2018-ravichandran-ashwin-possibility-of-captaining-kings-xi-punjab-tspo | आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार

आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - रविचंद्रन अश्विनने पंजाब संघाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  नुकत्याच बंगळुरुमध्ये झालेल्या लिलावात भारतीय संघातील अनुभवी अश्विनसाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी पंजाबनं मात करत अश्विनला खरेदी केलं. अश्विनसाठी पंजाबनं 7.6 कोटी रुपयांची बोली लावली. यापूर्वी अश्विने पुणे आणि चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. 
पंजाब संघानं यावेळी अश्निन, गेल, युवराज आणि डेविड मिलर यासारख्या अनुभवी खेळाडूसह के.एल. राहुल व अक्षर पटेल यांना खरेदी केलं आहे. यापैकी अश्विन, युवराज आणि मिलर कर्णधारपदाच्या शर्यतित आहेत. अश्विनने आज पंजाबचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

चेन्नईमध्ये गुजरातविरोधात विजय हजारे ट्रॉफीमध्ये सध्या तो खेळत आहे. सामन्यानंतर तो म्हणाला, मी आपल्या राज्याच्या संघाचा कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली आहे. जर पंजाब संघआची कप्तानी मला दिली तर मी ती चांगल्या पद्धतीनं स्विकारु शकतो. पण पंजाब संघाच्या स्टाफनं याबाबत अद्याप काही वक्तव्य केलं नाही.

31 वर्षीय अश्विन म्हणाला की, तमिळनाडू संघाच्या कर्णधारपदाची मी जबाबदारी स्विकारताना मी चांगली कामगिरी केली आहे. पण टी-20 प्रकारात मी संघाचे नेतृत्व केलेल नाही. जर मला पंजाब संघाकडून तशी ऑफर आली तर मी नक्कीच स्विकारेन अशी इच्छा अश्विनने व्यक्त केली. 

पंजाब संघ असा आहे - 
अक्षर पटेल (6.75 कोटी), रविचंद्रन अश्विन (7.6 कोटी ), युवराज सिंह (2 कोटी), करुण नायर (5.6 कोटी), लोकेश राहुल (11 कोटी), डेविड मिलर (3 कोटी), एरॉन फिंच (6.2 कोटी), मार्कस स्टोइनिस (6.2 कोटी), मयंक अग्रवाल (1 कोटी), अंकित सिंह राजपूत (3 कोटी), एंड्रू टाई (7.2 कोटी), मुजीब जादरान (4 कोटी), मोहित शर्मा (2.4 कोटी, राइट टू मैच), बरिंदर सरां (2.2 कोटी), क्रिस गेल (2 कोटी), बेन ड्वौर्शुइस (1.4 कोटी), अक्षदीप नाथ (1 कोटी), मनोज तिवारी (1 कोटी), मंजूर डार, प्रदीप साहू, मयंक डागर (20-20 लाख)

Web Title: ipl-2018-ravichandran-ashwin-possibility-of-captaining-kings-xi-punjab-tspo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.