IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन

उद्घाटन समारंभात रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, वरूण धवन, जॅकलीन फर्नांडीजसह अनेक कलाकार आपला जलवा दाखवणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 08:03 AM2018-03-28T08:03:38+5:302018-03-28T08:03:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018 - Ranveer Singh Reportedly Charging 5 Crore For 15-Minute Performance | IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन

IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदा अकराव्या सत्रासाठी झालेल्या नव्या लिलावानंतर क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचे सत्र वेगळ्या स्वरूपात समोर येणार असल्याचे त्याच्या उद्घाटन समारंभापासून ते समाप्तीपर्यंतचा प्रवास हटके आणि दमदार असणार याची खात्री सर्वच चाहत्यांना आहे.  7 एप्रिल ते 27 मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राला धडाकेबाज सुरुवात होणार आहे. वानखेडे मैदानावर होणाऱ्या उद्घाटन समारंभात अनेक बॉलिवूड कलाकार परफॉर्म करणार आहेत. सध्या मुंबईत उद्घाटन समारंभाची जोरजार तयारी सुरु आहे. उद्घाटन समारंभात रणवीर सिंह, प्रणिती चोप्रा, वरूण धवन जॅकलीन फर्नांडीजसह अनेक कलाकार आपला जलवा दाखवणार आहेत. 2017 मध्ये आयपीएलच्या दहाव्या सत्रात मलाइका अरोरा, सुशांत सिंह, दिशा पाटानी, रितेश देशमुख, एमी जॅक्शन, टाइगर श्रॉफ आणि कृति सेनन यांनी आपला जलवा दाखवल होता. 

पद्मावत हिट झाल्यानंतर रणवीरचा भाव चांगलाच वधारला आहे. माध्यामांच्या रिपोर्टनुसार, वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात रणवीर 15 मिनीटे परफॉर्म करणार आहे. त्यासाठी तो 5 कोटी रुपये घेणार आहे. उद्घाटन समारंभात परफॉर्म करणारऱ्या कलाकारांना दिल्या जाणाऱ्या रक्कमेमध्ये रणवीरला सर्वाधिक रक्कम दिली जात आहे.  

यंदाच्या आयपीएलच्या  उद्घाटन समारंभला फक्त चेन्नई सुरक किंग्जचा कर्णधार एमएस दोनी आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित असणार आहे. दोन्ही संघात पहिला सामना रंगणार आहे.  विराट कोहली( रॉयल चॅलेंजर्स बँळुरु) डेविड वॉर्नर(हैदराबाद), गौतम गंभीर( दिल्ली डेयरडेविल्स), आर अश्विन (किंग्स इलेवन), अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स), दिनेश कार्तिक(कोलकाता नाइट राइडर्स) हे सर्व कर्णधार अनुपस्थित असणार आहेत. 

यंदा डीआरएस...
या आधी झालेल्या सर्व सत्रांच्या तुलनेत यंदाचे आयपीएल सत्र सर्वात हटके असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा पंच समीक्षा प्रणाली (डीआरएस) लागू करण्यात येईल. विशेष म्हणजे, बीसीसीआय गेल्या अनेक वर्षांपासून डीआरएसच्या विरोधात आहे, पण आता आपल्या महत्त्वाच्या लीगमध्ये बीसीसीआयने डीआरएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: IPL 2018 - Ranveer Singh Reportedly Charging 5 Crore For 15-Minute Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.