IPL 2018: ... If Mumbai Indians do this, then they can still reach the semifinals | IPL 2018 : ... ' हे ' केलं तर मुंबई इंडियन्स अजूनही बाद फेरीत पोहोचू शकते
IPL 2018 : ... ' हे ' केलं तर मुंबई इंडियन्स अजूनही बाद फेरीत पोहोचू शकते

मुंबई : राजस्थान रॉयल्सकडून रविवारी मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले, असं काही जणं म्हणत आहेत. पण ' हे ' केलं तर मुंबई इंडियन्स अजूनही बाद फेरीत पोहोचू शकते. पण हे म्हणजे नेमकं काय, ते जाणून घ्या.

सध्याच्या घडीला राजस्थानने सहा विजयांमुळे 12 गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. मुंबईने आता पर्यंत पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि ते 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे मुंबईला आगामी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत, पण फक्त त्यांचे फक्त एवढ्यावरच भागणार नाही, तर त्यांना अजूनही काही गोष्टीही कराव्या लागतील. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या त्या पाहूया...

दोन्ही सामन्यांत मोठे विजय...
आता मुंबईचे आयपीएलमध्ये दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने मुंबईला जिंकावे लागतीलच, पण तेवढ्यावर हे चालणार नाही. कारण या दोन्ही सामन्यांत मोठे विजय मिळवले तरच मुंबईचा संघ बाद फेरीतील आशा कायम ठेवू शकतो.

हवी नशिबाचीही जोड...
दोन्ही सामन्यांत मुंबईला फक्त मोठे विजय मिळून चालणार नाही, तर त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी नशिबाचीही जोड लागेल. कारण आगामी सामन्यांत कोलकाता आणि पंजाब हे दोन्ही संघ मोठ्या फरकाने पराभूत झाले तर मुंबईचा संघ बाद फेरीत पोहोचू शकतो. 

आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे.


Web Title: IPL 2018: ... If Mumbai Indians do this, then they can still reach the semifinals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.