IPL 2018: Dhoni's daughter did dance on Bravo's 'champion' song | IPL 2018 : ब्राव्होच्या ' चॅम्पियन ' गाण्यावर धोनीच्या मुलीने केला डान्स

ठळक मुद्दे पार्टीत ब्राव्होच्या गाण्यावर चक्क ताल धरला तो महेंद्रसिंग धोनीची लेक झिवाने

नवी दिल्ली : ड्वेन ब्राव्हो हा एक अवलिया आहे. मैदानात आपल्या दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीने तो चाहत्यांचे मनोरंजन करतो. पण ब्राव्हो हा एक चांगला गायकही आहे. एका पार्टीत ब्राव्होच्या गाण्यावर चक्क ताल धरला तो महेंद्रसिंग धोनीची लेक झिवाने.सुरेश रैनाने आपली मुलगी ग्रेसिया हीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त चेन्नई सुपर किंग्ज संघाला एक पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये ब्राव्होने ' चॅम्पियन ' हे गाणे गायले. 2016 साली वेस्ट इंडिजने भारतामध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी ब्राव्होचे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. ब्राव्होने हेच गाणे रैनाच्या पार्टीतही गायले आणि या गाण्यावर झिवाने चांगलाच ठेका धरला.


Web Title: IPL 2018: Dhoni's daughter did dance on Bravo's 'champion' song
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.