भारतीय संघाला बसला दुखापतींचा फटका

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला संमिश्र यश मिळाले. टी-२० मलिका २-१ अशा फरकाने जिंकलेल्या भारतीय संघाला यानंतर एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:04 AM2018-07-20T02:04:13+5:302018-07-20T02:05:01+5:30

whatsapp join usJoin us
The injury to the Indian team was hit | भारतीय संघाला बसला दुखापतींचा फटका

भारतीय संघाला बसला दुखापतींचा फटका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-अयाझ मेमन
इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला संमिश्र यश मिळाले. टी-२० मलिका २-१ अशा फरकाने जिंकलेल्या भारतीय संघाला यानंतर एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. आता एकूणच मालिकेचा विचार पाहता इंग्लंड संघ विजयी लयीत असून याचा त्यांना आगामी १ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत फायदा होईल. याशिवाय हुकमी फलंदाज जो रुट जबरदस्त फॉर्ममध्ये परतला, ही इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरली.
पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडताना भारताने एकदिवसीय मालिकेतील कामगिरीचाही विचार केला. दोन शतके झळकावल्यानंतरही रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठी विचार झालेला नाही. त्याचवेळी सातत्याने बळी घेण्याच्या कामगिरीमुळे कुलदीप यादवला कसोटी संघात स्थान मिळाले. त्यामुळेच अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध खूप धावा काढल्यानंतरही त्याला कसोटी संघात स्थान मिळाले हे विशेष. त्याचबरोबर या दौºयात भारताला दुखापतींचाही फटका बसला आहे. टी-२० मालिका सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराहच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. यानंतर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाला. त्याच्या पुनरागमनावर प्रश्न निर्माण झाल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे.
यामुळे भारताला आपल्या किमान पहिल्या कसोटी सामन्यात प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीचा फटका बसेल. यामुळे भारताने
१८ सदस्यांचा संघ का निवडला
याचे स्पष्टीकरण मिळते. जर भुवी वेळेत तंदुरुस्त झाला, तर तो १९वा खेळाडू ठरेल.
>सुरेश रैना (१० पैकी ४)
पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर रैना चांगल्या फॉर्ममध्ये वाटला. दोन वर्षांपूर्वी जसा मोकळेपणे खेळायचा, त्याप्रमाणे रैनाची फटकेबाजी दिसत होती. पण आखूड टप्प्याच्या चेंडूची त्याची कमजोरी पुन्हा एकदा समोर आली.
>कुलदीप यादव (१० पैकी ८.५)
दोन मालिकेतून १४ बळी घेतलेल्या कुलदीपने आपल्या चायनामन फिरकी गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला चांगलेच नाचवले. यामुळेच त्याने कसोटी संघातही स्थान मिळवले. दरम्यान, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांना त्याची गोलंदाजी समजण्यात यश आले.
>लोकेश राहुल (१० पैकी ४)
टी-२० मालिकेत धमाकेदार शतक ठोकल्यानंतर राहुलकडून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दोन सामन्यांत खेळलेल्या खराब फटक्यांमुळे त्याला तिसºया सामन्यात संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्याच्याकडे भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून पाहिले जात असले, तरी त्याने स्वत:नेच निवड प्रक्रियेचे दार बंद केले.
>दिनेश कार्तिक (१० पैकी ४)
कार्तिकला संघाबाहेरच जास्त वेळ बसावे लागले. टी-२० मालिकेत त्याला संधी मिळण्याची आशा होती. तिसºया एकदिवसीय सामन्यात त्याला एकमेव संधी मिळाली आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पण चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला मोठी खेळी करता आली नाही.
>दीपक चहर (१० पैकी ४)
केवळ एका टी-२० सामन्यात चहरला संधी मिळाली. ऊन आणि सपाट खेळपट्टीवर चहरला अपेक्षित मारा करण्यात यश आले नाही. तरी त्याने नियंत्रित मारा करताना आपल्यात गुणवत्ता असल्याचे सिद्ध केले.
>रोहित शर्मा (१० पैकी ६)
रोहितने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत आपल्या लौकिकानुसार प्रत्येकी एक शतक झळकावले. पण त्यानंतर तो खराब फटके खेळून स्वस्तात बाद झाला. एकूणच त्याच्या अपयशाचा मोठा फटका भारताला बसला. यामुळेच त्याला कसोटी संघातून स्थान गमवावे लागले.
>विराट कोहली (१० पैकी ७.५ गुण)
कोहली चांगल्या लयीमध्ये दिसला. मात्र दोन अर्धशतकांपैकी एकाही खेळीचे तो शतकात रूपांतर करू शकला नाही. यामुळे भारताला थोडासा फटका बसला. याशिवाय त्याने अंतिम सामन्यात दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारला खेळविण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
>शार्दुल ठाकूर (१० पैकी ५.५)
एकमेव तिसºया एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेल्या शार्दुलने आपली छाप पाडली. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध केली असल्याने पुढील काही सामन्यांतही त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
>शिखर धवन (१० पैकी ५)
मालिकेच्या सुरुवातीपासून धवन चांगल्या लयीमध्ये दिसत होता. पण प्रत्येक वेळी तो चांगली सुरुवात केल्यानंतर बाद झाला.
>महेंद्रसिंग धोनी (१० पैकी ५.५)
दुसºया एकदिवसीय सामन्यातील एक संथ खेळी सोडली, तर धोनी दोन्ही मालिकेत चांगल्या स्थितीमध्ये दिसला. तो आपल्या लौकिकानुसार आणि महत्त्वाचे म्हणजे दबावात नेहमी चांगली कामगिरी करतो.
>उमेश यादव (१० पैकी ७)
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळताना उमेशने अचूक मारा केला आणि दोन मालिकांमधून चार सामने खेळताना त्याने ८ बळी घेतले. तो कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळू शकेल.
>युझवेंद्र चहल (१० पैकी ४.५)
चहल सर्व सहा सामने खेळला. परंतु, नियंत्रित आणि अचूक मारा केल्यानंतरही त्याला अपेक्षित बळी मिळवता आले नाहीत. यामुळेच सपाट आणि कोरड्या खेळपट्ट्यांवरील कोहलीच्या रणनीतींवरही प्रश्न निर्माण झाले.
>हार्दिक पांड्या (१० पैकी ५)
हार्दिकच्या अष्टपैलू खेळामुळे भारतीय संघ समतोल बनतो. तसेच फलंदाजी अधिक खोलवर बनते. तो टी-२० सामन्यात चमकला असला, तरी एकदिवसीय मालिकेत मात्र अपयशी ठरला आहे.
>भुवनेश्वर कुमार (१० पैकी ३.५)
भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेल्या भुवीने एकदिवसीय मालिकेची सांगता दुखापतीने केली. अखेरच्या सामन्यात पूर्ण तंदुरुस्त नसतानाही खेळणे मोठी चूक ठरेल. विशेष म्हणजे याचा मोठा फटका भारताला कसोटी मालिकेत बसू शकतो.
>सिद्धार्थ कौल (१० पैकी ३.५)
सिद्धार्थने एका टी-२० सामन्यात जबाबदारीपूर्वक मारा करताना २ बळी घेतले. पण यानंतर तो दोन एकदिवसीय सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. बळींची पाटी कोरी राहतानाच त्याने धावांची खैरातही केली.

(संपादकीय सल्लागार)

Web Title: The injury to the Indian team was hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.