इंद्रा नुयी यांची आयसीसीत ‘एंट्री’, संचालकपदी प्रथमच महिलेची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 5:44am

एका बड्या उद्योगसमुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नुयी यांचे क्रिकेट विश्वात पदार्पण झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.

दुबई : एका बड्या उद्योगसमुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नुयी यांचे क्रिकेट विश्वात पदार्पण झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत. आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जून २०१७ ला घेण्यात आला होता. नुयी जून २०१८ मध्ये पदभार स्वीकारतील. दोन वर्षांसाठी त्या पदावर असतील. मात्र, त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. इंद्रा नूयी या पदावर विराजमान होणाºया पहिल्या महिला आणि पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत. ‘फॉर्च्युन’मासिकाने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नूयी यांचा समावेश केला आहे. (वृत्तसंस्था)

संबंधित

डेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का
BLOG: एबी लीग क्रिकेट खेळू शकतो, तर देशासाठी का नाही?
भारताला 'विराट' धक्का; इंग्लंड दौऱ्यातून कोहलीची माघार?
क्रिकेट जगतामध्ये ‘ या ‘ गोष्टी फक्त डी’ व्हिलियर्सने केल्या आहेत... तुम्हाला माहिती आहे का...
एबी डिविलियर्सचे वादळी विक्रम, यादी पाहून अवाक व्हाल

क्रिकेट कडून आणखी

डॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी
चेन्नईच्या झुंजार खेळीला दाद द्यावी लागेल
क्रिकेट जगतामध्ये ‘ या ‘ गोष्टी फक्त डी’ व्हिलियर्सने केल्या आहेत... तुम्हाला माहिती आहे का...
एबी डिविलियर्सचे वादळी विक्रम, यादी पाहून अवाक व्हाल
BIG BREAKING... एबी डी'व्हिलियर्सचा क्रिकेटला अलविदा

आणखी वाचा