कोल्हापूरच्या अनुजाकडे भारताचे नेतृत्व, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जचीही दोन्ही संघांत निवड

मुंबई : भारतात रंगणा-या आगामी बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मलिकेसाठी भारताच्या महिला ‘अ’ संघाची घोषणा झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:02 AM2017-11-23T04:02:23+5:302017-11-23T04:02:36+5:30

whatsapp join usJoin us
India's leadership, Junka Rodriguez, Mumbaikar also selected in both the teams of Kolhapur Anuj | कोल्हापूरच्या अनुजाकडे भारताचे नेतृत्व, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जचीही दोन्ही संघांत निवड

कोल्हापूरच्या अनुजाकडे भारताचे नेतृत्व, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जचीही दोन्ही संघांत निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतात रंगणा-या आगामी बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मलिकेसाठी भारताच्या महिला ‘अ’ संघाची घोषणा झाली असून, कोल्हापूरच्या अनुजा पाटीलची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही संघांची धुरा अनुजाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्याच वेळी, गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा वर्षाव आणि शतकांचा धडाका लावलेल्या मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जचीही दोन्ही संघांमध्ये निवड करण्यात आली आहे.
>भारत ‘अ’ महिला एकदिवसीय
अनुजा पाटील (कर्णधार), एस. मेघना, नेहा तन्वर, नुझत प्रवीण (यष्टिरक्षक), कविता पाटील, प्रीती बोस, शिवांगी राज, देविका वैद्य, व्ही. आर. वनिथा, जेमिमा रॉड्रिग्ज, नीनू चौधरी, मानसी जोशी, सुकन्या परिदा, प्रियांका प्रियदर्शनी आणि एम. डी. थिरुशकामिनी.
भारत ‘अ’ महिला टी-२०
अनुजा पाटील (कर्णधार), एस. मेघना, जेमिमा रॉड्रिग्ज, स्वागतिका राठ, पूजा वस्त्राकर, टी. पी. कन्वर, सोनी यादव, रम्या डोली, व्ही. आर. वनिथा, डी. हेमलता, देविका वैद्य, तन्या भाटिया (यष्टिरक्षक), मेघना सिंग, राधा यादव आणि तरन्नूम पठाण.
१९ वर्षांखालील राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार द्विशतक झळकावून खोºयाने धावा काढणाºया मुंबईकर जेमिमाची निवड अपेक्षित होती आणि तिला निवडकर्त्यांनी दोन्ही संघांमध्ये स्थान दिले आहे. त्याच वेळी, बीड जिल्ह्यातील केज येथील कविता पाटील हिची एकदिवसीय सामन्यात वर्णी लागली आहे. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या कविताने १७ आणि १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपली छाप पाडली आहे. यानंतर तिने पश्चिम व मध्य रेल्वेकडूनही चमक दाखवली. २००९ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना कविताने शानदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले होते.
>कर्णधारपदाची जबाबदारी निश्चित पार पाडेन
अनुजाची प्रथमच एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये तिने यापूर्वी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. तिचा खेळ दिवसागणिक उंचावत आहे. तिच्यातील नेतृत्वगुणांची पारख करून बीसीसीआयने दिलेली ‘कर्णधार’पदाची जबाबदारी ती निश्चित पार पाडेल. ही निवड म्हणजे आमच्यासह कोल्हापूरकरांसाठी ‘दुग्धशर्करा’ योग आहे. तिने यापूर्वी महाराष्ट्र, पश्चिम विभागाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे ती दडपणाविना भरीव कामगिरी करेल. - शोभा अरुण पाटील, अनुजाची आई

Web Title: India's leadership, Junka Rodriguez, Mumbaikar also selected in both the teams of Kolhapur Anuj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.