भारताचा सलग आठवा मालिका विजय, धवनचे नाबाद शतक

कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्या अचूक मा-यानंतर शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या व निर्णायक वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी श्रीलंकेचा ८ गडी राखून सहज पराभव केला आणि मालिकेत २-१ ने सरशी साधली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:28 AM2017-12-18T00:28:21+5:302017-12-18T00:29:06+5:30

whatsapp join usJoin us
 India's eighth consecutive series win, Dhawan's unbeaten century | भारताचा सलग आठवा मालिका विजय, धवनचे नाबाद शतक

भारताचा सलग आठवा मालिका विजय, धवनचे नाबाद शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम : कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्या अचूक मा-यानंतर शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या व निर्णायक वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी श्रीलंकेचा ८ गडी राखून सहज पराभव केला आणि मालिकेत २-१ ने सरशी साधली.
भारताने ३२.१ षटकांत २१९ धावा फटकावत सहज विजय साकारला. धवनने ८५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०० धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने चार हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने अय्यरसोबत (६५) दुसºया विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिक २६ धावा काढून नाबाद राहिला. भारताने श्रीलंकेचा डाव ४४.५ षटकांत २१५ धावांत गुंडाळला होता.
भारताने सलग आठव्यांदा द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकली आणि श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कुठलीही मालिका न गमाविण्याची परंपरा कायम राखली. श्रीलंकेला १९९७ नंतर भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकता आलेली नाही. भारताने यापूर्वी कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. आता उभय संघांदरम्यान टी-२० सामन्यांची मालिका होणार असून पहिली लढत २० डिसेंबर रोजी कटकमध्ये होईल.
त्याआधी, कुलदीप यादव (३-४२) व यजुवेंद्र चहल(३-४६) यांच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा डाव २१५ धावांत गुंडाळला. हार्दिक पांड्याने दोन तर जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना योग्य साथ दिली.
श्रीलंकेचा डाव ४४.५ षटकांत संपुष्टात आला. उपुल थरंगाने ८२ चेंडूंना सामोरे जाताना केलेली ९५ धावांची खेळी श्रीलंकेच्या डावाचे आकर्षण ठरली. थरंगाने ही खेळी १२ चौकार व तीन षटकारांनी सजवली. त्याने सदीरा समरविक्रमसोबत (४२) दुसºया विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेने अखेरच्या ८ विकेट ५५ धावांत गमावल्या.
एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टीवर थरंगाने केवळ ३६ चेंडूंमध्ये ३६ वे अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, चहलने समरविक्रमला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. (वृत्तसंस्था)
धावफलक
श्रीलंका :- दानुष्का गुणतिलक झे. रोहित गो. बुमराह १३, उपुल थरंगा यष्टिचित धोनी गो. कुलदीप ९५, सदीरा समरविक्रम झे. धवन गो. चहल ४२, अँजेलो मॅथ्यूज त्रि. गो. चहल १७, निरोशन डिकवेला झे. अय्यर गो. कुलदीप ०८, असेला गुणरत्ने झे. धोनी गो. भुवनेश्वर १७, थिसारा परेरा पायचित गो. चहल ०६, सचिथ पतिराणा झे. चहल गो. पांड्या ०७, अकिला धनंजय त्रि. गो. कुलदीप ०१, सुरंगा लकमल पायचित गो. पांड्या ०१, नुवान फर्नांडो नाबाद ००. अवांतर (०८). एकूण ४४.५ षटकांत सर्वबाद २१५. बाद क्रम : १-१५, २-१३६, ३-१६०, ४-१६८, ५-१८९, ६-१९७, ७-२०८, ८-२१०, ९-२११, १०-२१५.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६.५-०-३५-१, जसप्रीत बुमराह ८-१-३९-१, हार्दिक पांड्या १०-१-४९-२, कुलदीप यादव १०-०-४२-३, यजुवेंद्र चहल १०-३-४६-३.
भारत :- रोहित शर्मा त्रि. गो. धनंजय ०७, शिखर धवन नाबाद १००, श्रेयस अय्यर झे. लकमल गो. परेरा ६५, दिनेश कार्तिक नाबाद २६. अवांतर (२१). एकूण ३२.१ षटकांत २ बाद २१९. बाद क्रम : १-१४, २-१४९. गोलंदाजी : लकमल ५-२-२०-०, धनंजय ७.३-०-५१-१, मॅथ्यूज ३-०-३०-०, पाथिराणा ४-०-३३-०, फर्नांडो ३-०-१०-०, परेरा ५-०-२५-१, गुणरत्ने ४-०-३०-०, गुणतिलक १-०-१२-०.

Web Title:  India's eighth consecutive series win, Dhawan's unbeaten century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.