भारताचा विजयी समारोप

रमणदीपसिंग आणि चिंगलेनसनासिंग यांच्या प्रत्येकी दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने आज गुरुवारी आॅस्ट्रियाचा ४-३ गोलने पराभव करीत युरोप दौ-याचा शेवट गोड केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 04:10 AM2017-08-18T04:10:36+5:302017-08-18T04:10:38+5:30

whatsapp join usJoin us
India's conquest concludes | भारताचा विजयी समारोप

भारताचा विजयी समारोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅम्सटेल्विन : रमणदीपसिंग आणि चिंगलेनसनासिंग यांच्या प्रत्येकी दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने आज गुरुवारी आॅस्ट्रियाचा ४-३ गोलने पराभव करीत युरोप दौ-याचा शेवट गोड केला.
रमणदीपने २५ तसेच ३२ व्या तर चिंगलेनसनासिंगने ३७ आणि ६० व्या मिनिटाला गोल केले. या दौºयात भारताने तीन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी केली. आॅस्ट्रियासाठी आॅलिव्हर बिडर याने १४ व्या आणि मायकेल कोफेरने ५३ व्या मिनिटाला गोल केले. तिसरा गोल पॅट्रिक अ‍ॅस याने ५५ व्या मिनिटाला नोंदविला. जगात चौथ्या स्थानावर असलेल्या नेदरलँडला सलग दोन सामने गमविल्यानंतर भारताने आॅस्ट्रियाविरुद्ध सावध पण हळूवार सुरुवात केली.
संपूर्ण सामन्यात चेंडूवर नियंत्रण भारतीय खेळाडूंचे होते, तरीही प्रतिस्पर्धी गोलफळीवर हल्ले करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. आॅस्ट्रियाने १४ व्या मिनिटाला बिडरच्या गोलमुळे भारतावर आघाडी घेतली. दुसºया क्वार्टरमध्ये चुका सुधारून भारतीय संघाने २५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. अमित रोहिदास याने दिलेल्या पासवर रमणदीपने चेंडू अचूक गोलजाळीत ढकलला.
मध्यंतरानंतर भारतीय संघ अधिक आक्रमक जाणवला. रमणदीपने ३२ व्या मिनिटाला स्वत:चा आणि
संघाचा दुसरा गोल नोंदवीत आघाडी संपादन केली.
रमणदीपने पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळविताच भारताला आघाडी घेण्याची आणखी एक संघी आली होती. पण चेंडू क्रॉसबारला लागून बाहेर जाताच संधी व्यर्थ गेली.
रमणदीपने ३७ व्या मिनिटाला उपकर्णधार चिंगलेनसनाकडे पास दिला. त्याने त्यावर गोल नोंदवीत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. तथापि आॅस्ट्रियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत पिछाडी भरून काढली.
आठ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना ललित उपाध्याय याला गोल नोंदविण्याची सुवर्ण संधी होती. आॅस्ट्रियाच्या गोलकीपरने चेंडू थोपविल्याने प्रयत्न वाया गेला. याचदरम्यान आॅस्ट्रियाने ५५ व्या मिनिटाला गोल नोंदवीतच सामना ३-३ असा बरोबरीत आला होता. अखेरच्या काही मिनिटांत अटीतटीचा खेळ झाला. भारताचा भर गोल नोंदविण्यावर होता. सामना संपायला १० सेकंद असताना चिंगलेनसनासिंगने रमणदीप आणि गुरजंत यांच्या पासवर शानदार गोल करीत विजय खेचून आणला. भारतीय संघ आज शुक्रवारी मायदेशी परतणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: India's conquest concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.