विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 02:47 PM2017-09-21T14:47:16+5:302017-09-21T18:05:42+5:30

whatsapp join usJoin us
India's batting decision in second ODI; Ajinkya vs Virat | विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान

विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट-रहाणेनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागिदारी केलीविराट कोहलीचं शतक हुकले, त्यानं 92 धावांची खेळी केली

कोलकाता, दि. 21 - कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत. कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. सलामिवीर रोहित शर्मा आज स्वस्तात सात धावांवर बाद झाला. त्याला नाथन कूल्टर नाईलने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.  

रहाणे-विराटनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागिदारी केली. रहाणे अर्धशतकानंतर धावबाद झाला. रहाणेनं आपले 22 वे अर्धशतकसाजरे केलं. अजिंक्य रहाणे या मालिकेत चांगली कामगिरी करून संघात आपले स्थान कायम राखण्याचे प्रयत्न करत आहे. रहाणे बाद झाल्यानंतर मनिष पांडेही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेल्या केदार जाधवनं काही उत्कृष्ट फटके मारले. मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानं 24 धावांची खेळी केली. एकीककडे कर्णधार विराट कोहली तळ ठोकून होता. मात्र त्याला योग्य ती साथ मिळत नसल्याचे दिसून येत होते. जाधव बाद झाल्यानंतर मैदानावर आलेला माजी कर्णधार धोनीही फारशी चमक दाखवू शकला नाही. तोही स्वस्तात बाद झाला. 

कर्णधार विराट कोहलीनं एकाबाजूनं दमदार खेळीच पर्दशन करताना 92 धावांची खेळी केली. दुर्देवानं त्याला शतकानं हुलकावणी दिली. विराट कोहलीच्या नावे30 शतके आहेत. सर्वाधिक शतकामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसह तो दुसऱ्या स्थानावर आहे.  
शेवटच्या काही षटकांमध्ये भुवनेश्वर आणि हार्दिक पांड्यानं धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कोणतीही संधी दिली नाही. भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिलं आहे. गेल्या सामन्यातील विजयी संघच भारतानं कायम ठेवला आहे. 

विराट कोहलीचं विक्रमी शतक हुकले - 
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहली आपल्या वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 31 वे शतक करता करता राहिला. विराटनं 107 चेंडूचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीनं 92 धावा ठोकल्या. विराटनं आज जर शतक झळकावलं आसते तर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडत सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असती. सर्वाधिक शतके भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहेत. सचिननं वन-डेमध्ये 49 शतके झळकावली आहेत. 

Web Title: India's batting decision in second ODI; Ajinkya vs Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.