भारताने काढले पराभवाचे उट्टे, दुस-या एकदिवसीय सामन्यात विजय

पुणे : शिखर धवन (६८) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ६०) यांचे दमदार अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमार, बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करीत पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:05 AM2017-10-26T00:05:56+5:302017-10-26T00:06:17+5:30

whatsapp join usJoin us
India won the elimination patch, second ODI match | भारताने काढले पराभवाचे उट्टे, दुस-या एकदिवसीय सामन्यात विजय

भारताने काढले पराभवाचे उट्टे, दुस-या एकदिवसीय सामन्यात विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आकाश नेवे
पुणे : शिखर धवन (६८) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ६०) यांचे दमदार अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमार, बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करीत पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. भारताने ४ बाद २३२ धावा करत विजयाचे आव्हान पूर्ण केले.
गहुंजे येथील मैदानावर बुधवारी रंगलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५० षटकांत ९ बाद २३० धावांत रोखले. न्यूझीलंडच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा डावाच्या चौथ्या षटकातील टीम साऊदीच्या तिसºया चेंडूवर रोहित शर्माने कॉलिन मुन्रोकडे झेल दिला. भारताची धावसंख्या २२ होती. रोहित बाद होताच कोहली येणार म्हणून पुणेकर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. साऊदीने एका बाऊन्सरने कोहलीचे स्वागत केले. मात्र पुढच्याच चेंडूवर चौकार लगावत त्याने आक्रमणातील हवा काढून घेतली. दहा षटकांनंतर भारताने ६४ धावा केल्या होत्या. कोहलीने एका बाजूने फटकेबाजी सुरू केली. मात्र कॉलिन डी ग्रॅण्ड होम याने कोहलीला यष्टीमागे झेलबाद केले. कोहली बाद होताच मैदानात एकच शांतता पसरली. कोहली बाद झाल्यावर भारताची धावगती कमी झाली. त्यानंतर पुढच्या दहा षटकांत भारताने ४६ धावा केल्या. पहिल्या ५० धावा ४७ चेंडूंत केल्यानंतर पुढच्या ५० धावा करण्यासाठी ७३ चेंडू घेतले. शिखर धवन याने ६३ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले. या दोघांनी काही वेळ संघाचा डाव सावरला. दोघांनी ६६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर धवन वैयक्तिक ६८ धावांवर बाद झाला. ८४ चेंडूंमध्ये केलेली खेळी त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. अ‍ॅडम मिल्नेच्या गोलंदाजीवर त्याने रॉस टेलरकडे सोपा झेल दिला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी संघाचा डाव सावरला. कार्तिकने ७६ चेंडंूत आपले अर्धशतक साजरे केले. संघ विजयाच्या समीप आलेला असताना सँटेनरच्या चेंडूवर पांड्या फसला आणि झेलबाद झाला. पांड्या आणि दिनेश या दोघांनी ६५ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. पांड्या बाद झाल्यावर धोनी आणि कार्तिक यांनी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी न्यूझीलंडचे फलंदाज पुन्हा एकदा सूर गवसलेल्या भारतीय गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्स आणि डी ग्रॅण्डहोम वगळता एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. भुवनेश्वर कुमारने गुप्टिलला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेचच भुवनेश्वरने कॉलिन मुन्रोला तंबूत पाठवले. वानखेडेवर शतक झळकावणाºया रॉस टेलरला या सामन्यात हार्दिक पांड्याने बाद केले. टेलरने ३३ चेंडंूत २१ धावा केल्या. कुलदीप यादवऐवजी संधी मिळालेल्या अक्षर पटेलने टॉम लॅथमला पायचित पकडत संघासमोरचा मोठा धोका
दूर सारला.

लॅथम आणि निकोल्स तसेच निकोल्स आणि ग्रॅण्डहोम यांनी उपयुक्त भागीदाºया करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. निकोल्स आणि ग्रॅण्डहोम यांनी ४७ धावांची भागीदारी केली. निकोल्सने ६२ चेंडूंत ४२ धावा केल्या, तर मिशेल सँटेनर याने २९ धावांचे योगदान दिले.
४३ व्या षटकात यजुवेंद्र चहल याने सलग दोन चेंडूंवर ग्रॅण्डहोम आणि मिल्ने यांना बाद केले. डी ग्रॅण्डहोम याने ४० चेंडूंतच ४१ धावा तडकावल्या. त्या वेळी संघाची धावसंख्या ८ बाद १८८ अशी होती. सँटेनर आणि साऊदी यांनी फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. साऊदी याने २२ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना कानपूर येथे होणार आहे.
>धावफलक
न्यूझीलंड : एकूण ५० षटकांत ९ बाद २३० :मार्टिन गुप्टिल झे. धोनी, गो. भुवनेश्वर कुमार ११, कॉलिन मुन्रो त्रि. गो. भुवनेश्वर १०, केन विल्यम्सन पायचित गो. बुमराह ३, रॉस टेलर झे. धोनी, गो. पांड्या २१, टॉम लॅथम त्रि. गो. अक्षर पटेल ३८, हेन्री निकोल्स त्रि. गो. भुवनेश्वर कुमार ४२ कॉलिन डी ग्रॅण्डहोम झे. बुमराह गो. चहल ४१, मिशेल सँटेनर झे. कोहली गो. बुमराह २९, अ‍ॅडम मिल्ने पायचित गो. चहल ०, टीम साउदी नाबाद २५, ट्रेंट बोल्ट नाबाद २. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-४५-३, जसप्रीत बुमराह १० २-३८-२, केदार जाधव ८-०३१-०, हार्दिक पांड्या ४-०-२३-१, अक्षर पटेल १०-१-५४-१, चहल ८-१-३६-२.
भारत : एकूण ४ बाद २३१ : रोहित शर्मा झे. मुन्रो गो. साऊदी ७, शिखर धवन ६८ झे. टेलर गो. अ‍ॅडम मिल्ने, कोहली झे. लॅथम गो. डी ग्रॅण्डहोम २९, दिनेश कार्तिक नाबाद ६४ , हार्दिक पांड्या झे. अ‍ॅडम मिल्ने गो. मिशेल सँटेनर ३०, महेंद्रसिंह धोनी नाबाद २२.

Web Title: India won the elimination patch, second ODI match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.