India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'

जोशमध्ये जर तुम्ही होश हरवून बसलात तर सामना तुमच्या हातून निसटू शकतो.

By प्रसाद लाड | Published: June 15, 2019 07:53 PM2019-06-15T19:53:38+5:302019-06-15T19:56:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, World Cup 2019: this will be 'X factor' in India-Pakistan match | India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान सामनाकाही तासांवर येऊन ठेपला आहे.  या सामन्यात भारतीय संघ विश्वचषकातील विजयी परंपरा कायम राखणार की पाकिस्तानचा संघ इतिहास लिहीणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. या सामन्यात  'X फॅक्टर' नेमका काय ठरणार, याची उस्तुकता साऱ्यांना असेल. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद आमीर, अशी काही नावं तुमच्या ओठांवर आपसूकच येतील. पण या सामन्यात कोणताही खेळाडू 'X फॅक्टर' ठरणार नाही. कारण या महासंग्रामात यशस्वीपणे दडपण कसे हाताळता, हा  'X फॅक्टर' ठरणार आहे. त्यामुळे जोशमध्ये जर तुम्ही होश हरवून बसलात तर सामना तुमच्या हातून निसटू शकतो. त्यामुळे बिनधास्त खेळा, पण क्रिकेटच्या पावित्र्याला धक्का लागेल, असे मात्र करू नका.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळाडूंवर जबरदस्त दडपण असते. पण हाच सामना जेव्हा विश्वचषकात खेळवला जातो, तेव्हा हे दडपण बऱ्याच पटींने वाढलेले असते. त्यावेळी खेळाडू एखादी नवीन गोष्ट करताना बराच विचार करतात. हा विचार करत असताना प्रतिस्पर्धी संघ ती गोष्ट करून यश आपल्या पदरात पाडून घेते, असे पाहायला मिळते. त्याचबरोबर बऱ्याचदा एखादी चूक घडते आणि त्यानंतर खेळाडू निराश होतात. काही वेळा खेळाडू निराशेच्या गर्तेत अडकतात आणि त्यामधून बाहेर त्यांना पडता येत नाही. त्यामुळे जेवढे दडपण तुम्ही ओढावून घ्याल, तेवढीच तुमची कामगिरी चांगली होऊ शकणार नाही.

भारत-पाकिस्तान सामन्याचे दडपण काय असते, हे सर्वात जास्त अनुभवले असेल ते सचिन तेंडुलकरने. कारण आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या ६ सामन्यांपैकी सचिन पाच सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याचबरोबर पाच पैकी तीन सामन्यांमध्ये त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला आहे. 

तुम्हाला कदाचित सचिनची एक गोष्ट माहिती नसेल. ही गोष्ट आहे २०११ साली झालेल्या विश्वचषकाची. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोहालीत महत्वाचा सामना रंगणार होता. दोन्ही संघांनी कसून सराव केला. पण दोन्ही संघांतील मोठा फरक ठरला तो सचिन. कारण सचिनने सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सचिनने दडपण या गोष्टीवर मार्गदर्शन केले होते. या मार्गदर्शनाचा चांगलाच फायदा संघाला झाला होता. यावेळी खेळाडूंना मनोबल उंचावण्याचे 'इंजेक्शन' देण्यात निष्णात असणारे रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यामुळे जो या सामन्यात उत्तमपणे दडपण हाताळेल, त्याचाच विजय होईल हे मात्र नक्की.

Web Title: India vs Pakistan, World Cup 2019: this will be 'X factor' in India-Pakistan match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.