India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात

भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी पाकिस्तानच्या गोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांना दुहेरी धक्का दिला. या दरम्यान ही गोष्ट घडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 06:27 PM2018-09-20T18:27:39+5:302018-09-20T18:29:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan: why rohit sharma folding his hands in front of yuzvendra chahal | India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताने बुधवारी पाकिस्तानला पराभूत केले. पण या सामन्यात अशी एक खास गोष्टी घडली, जी बऱ्याच लोकांनी पाहिली नाही.

दुबई, आशिया चषक 2018 : भारताने बुधवारी पाकिस्तानला पराभूत केले. पण या सामन्यात अशी एक खास गोष्टी घडली, जी बऱ्याच लोकांनी पाहिली नाही. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू युजवेंद्र चहलपुढे चक्क हात जोडले.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी पाकिस्तानच्या गोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांना दुहेरी धक्का दिला. या दरम्यान ही गोष्ट घडली.

पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान हा नेहमीच भारतासमोर चांगली फलंदाजी करत आला आहे. त्यामुळे त्याचा बळी भारतासाठी महत्त्वाचा होता. यावेळी भुवनेश्वरने अचूक मारा करत झमानला झेल देण्यात भाग पाडले. भुवनेश्वरला मोठा फटका मारण्याच्या नादात झमानचा झेल उडाला आणि तो झेल युजवेंद्र चहलने पकडला. यावेळी रोहित चहलजवळ धावत गेला आणि त्याने त्याच्यापुढे हात जोडले.

Web Title: India vs Pakistan: why rohit sharma folding his hands in front of yuzvendra chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.