India vs Pakistan : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

रोहितने पाकिस्तानच्या उस्मान खानच्या दुसऱ्या षटकात चौकार लगावला आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:05 PM2018-09-19T21:05:44+5:302018-09-19T21:06:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan: Rohit Sharma's record, Virat Kohli behind | India vs Pakistan : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

India vs Pakistan : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देविक्रम रचताना रोहितने विराट कोहलीला मागे टाकले आहे.

दुबई, आशिया चषक 2018 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम रचताना रोहितने विराट कोहलीला मागे टाकले आहे.

रोहितने पाकिस्तानच्या उस्मान खानच्या दुसऱ्या षटकात चौकार लगावला आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. आशिया चषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता.



 

विराटने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांत २०६ धावा केल्या आहेत. त्यात १८३ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर 204 धावा होत्या. रोहितने चौकार लगावला आणि सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला.

Web Title: India vs Pakistan: Rohit Sharma's record, Virat Kohli behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.