India Vs Pakistan, Latest News: भारताला मोठा धक्का; भुवनेश्वर कुमारला दुखापत

त्यामुळे आता भुवनेश्वर पुन्हा मैदानात येणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 08:44 PM2019-06-16T20:44:16+5:302019-06-16T20:45:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, Latest News: India's Bhuvneshwar Kumar injured | India Vs Pakistan, Latest News: भारताला मोठा धक्का; भुवनेश्वर कुमारला दुखापत

India Vs Pakistan, Latest News: भारताला मोठा धक्का; भुवनेश्वर कुमारला दुखापत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धचा सामना सुरु असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता भुवनेश्वर पुन्हा मैदानात येणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे.

भुवनेश्वर भारताकडून पाचवे षटक टाकत होता. या षटकातील चार चेंडू त्याने टाकले. पण चौथा चेंडू टाकल्यावर भुवनेश्वरला आपण फिट असल्याचे वाटत नव्हते. हा चेंडू टाकल्यावर भुवनेश्वरचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे भुवनेश्वरला चौथ्या चेंडूनंतर माघारी जावे लागले.


भारताला 'शंकर' पावला; दिली ही गूड न्यूज...
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला 'शंकर' पावल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताला पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावा करता आल्या. भारतीय संघ जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा त्यांना 'शंकर' पावल्याचे पाहायला मिळाले.


भुवनेश्वर कुमारला पाचव्या षटकात दुखापत झाली. त्यामुळे भुवनेश्वरला या षटकात फक्त चार चेंडूच टाकता आले. त्यानंतर मात्र भुवनेश्वर माघारी परतला. यावेळी भुवनेश्वरच्या जागी विजय शंकरला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. शंकरने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या इमाम उल हकचा काटा काढला आणि भारतीय संघाला गोड बातमी दिली.

रोहित-कोहलीने वाजवला पाकिस्तानचा बँड, विजयासाठी दिले 337 धावांचे आव्हान
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच बँड वाजवला. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 336 धावा करता आल्या.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कारण भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली. रोहित शर्माने तर १४० धावा फटकावत पाकिस्तानच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले.

रोहितने या सामन्यात ११३ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १४० धावांची खेळी साकारली. या १४० धावांच्या खेळीनंतर रोहितने आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता. कोहलीने यावेळी ६५ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ७७ धावा केल्या.

Web Title: India vs Pakistan, Latest News: India's Bhuvneshwar Kumar injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.