India Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव

... अन् रोहित शर्मा आऊट होता होता वाचल होता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 05:27 PM2019-06-16T17:27:22+5:302019-06-16T17:29:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, Latest News: Indian players give best wishes to Rohit Sharma | India Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव

India Vs Pakistan, Latest News: रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : रोहित शर्मानेपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. रोहितच्या शतकामुळेच भारतीय संघ भक्कम धावसंख्येच्या दुशेने कूच करत आहे. रोहितने शतक झळकावल्यावर भारताच्या खेळाडूंनी त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.







... अन् रोहित शर्मा आऊट होता होता वाचला...
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. पण या सामन्यात एक क्षण असा आला होता की, सलामीवीर रोहित शर्मा आऊट होणार होता. पण पाकिस्तानच्या खेळाडूच्या एका चुकीमुळे रोहित वाचला. नेमके घडले तरी काय, ते जाणून घ्या...

ही घटना घडली ती सामन्याच्या दहाव्या षटकात. वहाब रियाझ यावेळी गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू लोकेश राहुले तटवला. त्यानंतर रोहित आणि राहुल या दोघांनीही एक धाव घेतली. त्यानंतर रोहित दुसरी धाव घेण्यासाठी धावत आला. राहुलने दुसरी धाव घ्यायची नाही, हे वारंवार सांगत होता. पण ते न ऐकता रोहित धावत आला.

रोहित शर्मा धावत येत आहे, हे पाहून राहुलही थोडासा पुढे सरसावला. तोपर्यंत रोहित खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत आला होता. त्यावेळी रोहितला कळले की आपण धावचीत होऊ शकतो आणि त्यानंतर त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या खेळाडूने यावेळी राहुलच्या दिशेने थ्रो केला. पण हा थ्रो जर रोहितच्या दिशेने झाला असता तर तो बाद झाला असता.

भारताची चौकारानिशी दणक्यात सुरुवात
भारत आणि पाकिस्तान या सामन्यात सर्वच खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. पण या सामन्यामध्ये भारताने चौकारानिशी दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्माच्या बॅटमधून हा चौकार आला.


पाकिस्तानने नाणेफक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पहिलेच षटक भन्नाट टाकले. या षटकात आमीरने एकही धाव दिली नाही. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या षटकात मात्र भारताच्या धावसंख्येची सुरुवात ही चौकाराने झालेली पाहायला मिळाली.

Web Title: India vs Pakistan, Latest News: Indian players give best wishes to Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.