India vs New Zealand : पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी टॉपर, पण नावावर नोंदवला नकोसा विक्रम

India vs New Zealand : भारतीय संघाची न्यूझीलंडमधील ट्वेंटी-20 क्रिकेटमधील विजयाची पाटी नऊ वर्षानंतरही कोरीच राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:30 PM2019-02-07T13:30:33+5:302019-02-07T13:31:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand : MS Dhoni earns THIS unwanted record as New Zealand thrash India in 1st T20I | India vs New Zealand : पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी टॉपर, पण नावावर नोंदवला नकोसा विक्रम

India vs New Zealand : पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी टॉपर, पण नावावर नोंदवला नकोसा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाची न्यूझीलंडमधील ट्वेंटी-20 क्रिकेटमधील विजयाची पाटी नऊ वर्षानंतरही कोरीच राहिली. भारतीय संघाला यजमान न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 80 धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडच्या 219 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 139 धावांत तंबूत परतला. भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम महेंद्रसिंग धोनी (39) याच्या नावावर राहिला. पण, टॉपर राहिल्यामुळे धोनीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. 

220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन व विजय शंकर वगळता भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा (1), रिषभ पंत (4), दिनेश कार्तिक ( 5), हार्दिक पांड्या ( 4) यांनी निराश केले. इश सोधी व मिचेल सँटनर यांनी भारताच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर होता खरा, परंतु धावा आणि चेंडू यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्यात तो अपयशी ठरला. 39 धावांवर धोनी बाद झाला.

या सामन्यात धोनीने 13 वी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1500 धावांचा पल्ला गाठला. ट्वेंटी-20 त 1500 धावा करणारा धोनी हा चौथा भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे धोनीने अंतिम टप्प्यातील 500 धावा या आधीपेक्षा जलद केले. ट्वेंटी-20 त त्याने पहिल्या 500 धावा 28 डावांत, तर दुसऱ्या 30 डावांत पार केल्या. 1000 ते 1500 हा पल्ला गाठण्यासाठी त्याला केवळ 23 डाव खेळावे लागले. 

(महेंद्रसिंग धोनी टॉपर, कॅप्टन कूलचा पराक्रम )

यष्टिरक्षक धोनीने या सामन्यात 31 चेंडूंत 39 धावा केल्या. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज धोनीच ठरला. ट्वेंटी-20 सामन्यात पाचव्यांदा संघात टॉपर राहूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.  

टॉपर धोनी अन् भारताचा पराभव
48* विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2012 ( 31 धावांनी पराभूत ) 
38 विरुद्ध इंग्लंड, मुंबई, 2012 ( सहा विकेट्सने पराभव)
30 विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, 2016 ( 47 धावांनी पराभव ) 
36* विरुद्ध इंग्लंड, कानपूर, 2017 ( 7 विकेट्सने पराभूत )
39 विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, 2019 ( 80 धावांनी पराभव) 

Web Title: India vs New Zealand : MS Dhoni earns THIS unwanted record as New Zealand thrash India in 1st T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.